Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Works in July 2023: जुलै महिन्यातच पूर्ण करा 'ही' महत्त्वाची आर्थिक कामे; जाणून घ्या सविस्तरपणे

Financial Work in July 2023

Financial Works in July 2023: नवीन तिमाही (New Quarter) जुलै महिन्यापासून सुरू झाली आहे. त्यासोबतच अनेक आर्थिक गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. हे बदल समजून घेत जुलै महिन्यातच ती कामे पूर्ण करणे गरजेचे आहे.

Financial Works in July 2023: नवीन महिना सुरु होताच अनेक गोष्टींमध्ये बदल होतात. जून महिना संपून जुलै महिना सुरु झाला आहे. याच महिन्यात नवीन तिमाही (New Quarter) देखील चालू झाली आहे. त्यामुळे अनेक आर्थिक गोष्टींमध्ये बदल झाले आहेत. हे बदल लक्षात घेऊन तुम्ही त्यासंदर्भातील कामे पूर्ण करायला हवीत. ही कामे जुलै महिन्यात पूर्ण झाली नाहीत, तर तुम्हाला दंड स्वरूपात ठराविक रक्कम भरावी लागू शकते. कोणती आहेत ती कामे, जाणून घेऊयात.  

जास्त पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज करा (Apply for higher pension)

भारत सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) चालवते. या माध्यमातून कर्मचारी आपल्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करतात. कर्मचारी आणि एम्प्लोयर दोघेही यामध्ये सामान आर्थिक गुंतवणूक करतात.  

EPFO कडून तुम्हाला जास्त पेन्शन मिळवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जुलै 2023 असणार आहे. हा अर्ज तुम्ही EPFO ​​च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करू शकता.

आयटीआर वेळेत फाईल करा (File ITR on time)

जुलै महिना म्हटलं की आयटीआर (ITR) भरणं आलंच. करदात्यांनी आर्थिक वर्ष 2022-23 आणि चालू वर्ष 2023-24 साठी 31 जुलैपर्यंत आयटीआर (ITR) दाखल करणे आवश्यक आहे. आयटीआर दाखल करण्याची ही शेवटची तारीख आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत आयटीआर भरला नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हा दंड 5 हजार रुपये इतका असेल. तुम्हाला हा दंड टाळायचा असेल, तर तुम्ही 31 जुलैपूर्वी तुमचा आयटीआर दाखल करणे गरजेचे आहे.

गुंतवणुकीची संधी (Investment opportunity)

केंद्र सरकारने जुलै ते ऑक्टोबर या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. 1 जुलैपासून या व्याजदराची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तुम्हालाही छोट्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवायचे असतील, तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सरकारने या योजनांमधील व्याज 0.10 टक्क्यांवरून 0.30 टक्के इतके वाढवले आहे.

Source: hindi.moneycontrol.com