Sunflower Cultivation: जमिनीचा पोत राखून ठेवण्यासाठी पिकांमध्ये फेरबदल (Alteration in crops) करणं अतिशय महत्वाचं आहे. हे लक्षात घेऊनच
वाशीम(Washim) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी(Farmers) सूर्यफुल(Sunflower Cultivation) लागवडीकडे मोर्चा वळवला आहे. यंदाच्या रब्बी हंगामामध्ये(Rabi Season) वाशिम जिल्ह्यात तब्बल 25 हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाची लागवड करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. सद्याच्या स्थितीत तेलांच्या किमंती वाढलेल्या (Oil prices increased) पाहायला मिळत असताना शेतकऱ्यांनी उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. चला तर याबद्दल माहिती जाणून घेऊयात.
25 हेक्टर क्षेत्रावर सुर्यफुलाची लागवड
रब्बी हंगामामध्ये(Rabi Season) पारंपरिक पिकामध्ये येणाऱ्या सूर्यफुलाच्या शेतीकडे गेल्या काही दशकापासून शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. वन्यजीवन प्राण्यांसह पक्षांचा होणार त्रास, तसेच सातत्याने कमी मिळणारे दर(Rate) यामुळे शेतकऱ्यांनी सूर्यफूल पिकाची पेरणी टाळली होती. मात्र, आता पुन्हा वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 25 हेक्टर क्षेत्रावर सुर्यफुलाची लागवड केली आहे.
तिन्ही हंगामात येणारे पीक
सूर्यफूल पिकासाठी रब्बी हंगामातील(Rabi Season) वातावरण अत्यंत पोषक असते. सूर्यफूल हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तेलवर्गीय पीक असून हे पीक कमी कालावधीत येणारे आहे. विशेष म्हणजे सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात हे पीक हमखास येते. पावसाचा ताणही बर्याच प्रमाणात हे पीक सहन करु शकते. सूर्यफुलाची सरासरी उत्पादकता वाढवण्यासाठी सुधारित आणि संकरित वाणाचा वापर करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. तुम्हाला ठाऊक आहे का, ज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार सूर्यफूल त्या दिशेने वळते. याचा वापर प्रामुख्याने तेल(Oil) काढण्यासाठी केला जातो. हे तेल अनेक घरगुती आणि पाककृतींमध्ये वापरले जाते.
पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक
गेल्या काही वर्षांपासून शेतकरी प्रामुख्याने पावसाळ्यात खरीप तर उन्हाळ्यात भाजीपाला लागवड करत आहे.मात्र ग्रामीण भागातील बरेच कमी शेतकरी खाद्यतेलाच्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. सूर्यफूल पिकाच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन गरजेचे असते. ज्यामध्ये या पिकाची उत्तमरीत्या वाढ होते.