Cultivation Of Vegetables : भारतात अनेक प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात ज्या वर्षभर उपलब्ध असतात. काही भाज्या अशा आहेत ज्या केवळ एका हंगामात उपलब्ध असतात. उदा. अंबाडी, चवळी,तरोटा, कुंजर या सर्व भाज्या फक्त पावसाळ्यात उपलब्ध असतात. जाणून घेऊया पावसाळ्यात शेतात कोणत्या भाज्यांची लागवड केल्यास भरघोस नफा मिळू शकतो.
तीन प्रकारच्या भाज्यांचे पीक पावसाळ्यात घेता येते
कृषी तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात साधारणपणे तीन प्रकारची पिके घेतली जातात. पावसाळ्यात ही पिके भरघोस नफाही देतात. या तीन प्रकारच्या पिकांमध्ये वेल भाजीपाला, उभ्या पिकांच्या भाज्या आणि जमिनीच्या आत उगवलेल्या भाज्या यांचा समावेश होतो. यासोबतच फ्लॉवर, चवळी, कारले, पालक, सोयाबीन, भेंडी, कांदा, राजगिरा, कोबी, काकडी, वांगी, मिरची, मुळा इत्यादींची पेरणीही मुबलक प्रमाणात केली जाते. या भाजीपाल्याचे उत्पादन पावसात भरपूर होते.
उत्पादन खर्च किती येतो?
फ्लॉवर, चवळी, कारले, पालक, सोयाबीन, भेंडी, कांदा, राजगिरा, कोबी, काकडी, वांगी, मिरची, मुळा हे पीक कोणत्याही जमिनीत होते. त्यामुळे या सर्व पिकांची लागवड केल्यास जास्त खर्च येत नाही. यासाठी फक्त बियाणे, खत आणि किटकनाशके यासाठी खर्च येतो. 1 एकर शेतात कोणत्याही पिकासाठी जास्तीत जास्त उत्पादन खर्च हा 30 हजार रुपयांपर्यंत असेल. ग्राहकांकडून ताजा भाजीपाल्याची जास्तीत जास्त मागणी असते, ती मागणी पूर्ण केल्यास जास्तीत जास्त नफा मिळू शकतो.
नफा किती मिळू शकतो?
सध्या भाज्यांचे दर खूप वाढले आहेत, कारण पावसाळ्याची सुरवात असल्याने भाज्यांची आवक कमी आहे. भाजीपाला ही जीवनावश्यक गोष्ट असल्याने त्यातून नफा हा मिळतोच. 1 एकर शेतात जवळपास 40 हजार रुपये नफा मिळू शकतो. यापेक्षा जास्त आणि कमी सुद्धा होऊ शकतो. त्यासाठी भाजीची क्वालिटी तशी पाहिजे. पावसाळ्यात भाजीपाला लागवड करताना झाडांच्या मुळांवर जास्त माती असेल याची विशेष काळजी घ्यावी.
कारण पावसाळ्यात झाडांच्या मुळांपासून माती काढली जाते. पावसाळ्यात भाजीपाला लागवड करताना कीटकनाशकांचाही वापर करावा. वास्तविक, पावसाळ्यात झाडांना अनेक प्रकारचे रोग होतात. अशा परिस्थितीत खते आणि कीटकनाशकांचा वापर करणे आवश्यक आहे. भारतात जून ते 15 सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. अशा परिस्थितीत माती ओलसर राहून शेतीसाठी योग्य आहे.
Source : www.abplive.com
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            