Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fantasy Games Industry: तरुणाईमध्ये फॅन्टासी गेम्सची क्रेझ! भारतात 18 कोटी युर्जस आणि 6800 कोटींची उलाढाल

Fantasy Sports

Fantasy Games Industry: मागील 20 वर्षात फॅन्टासी स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये तीनपटीने वाढ झाली आहे. फॅन्टासी स्पोर्ट्समध्ये क्रिकेटसह कबड्डी, हॉकी, बास्केटबॉल आणि फुटबॉलयवर देखील गेम्स आहेत. भारतात किमान 15 स्टार्टअप्स फॅन्टासी स्पोर्ट्स श्रेणीत जबरदस्त कामगिरी करत आहेत. त्यातील 3 स्टार्टअप्सने युनिकॉर्न होण्याचा पराक्रम केला आहे.

आयपीएल आणि फुटबॉलसारख्या स्पोर्ट्स सिरिजच्या माध्यमातून फॅन्टासी गेम्स तयार करणाऱ्या कंपन्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. फॅन्टासी स्पोर्ट्सने तरुणाईला अक्षरश: वेड लावले आहे. हजारो कोटींच्या या इंडस्ट्रीजमधून 03 स्टार्टअप्सने युनिकॉर्न होण्याचा किमया केली आहे. आजच्या घडीला भारतात 300 हून अधिक फॅन्टासी स्पोर्ट्स असून या इंडस्ट्रीची एकूण उलाढाल 6800 कोटीपर्यंत वाढली आहे. मोबाईलवर किमान 18 कोटी युजर्स फॅन्टासी गेम्स खेळत असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

मागील 20 वर्षात फॅन्टासी स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये तीनपटीने वाढ झाली आहे. फॅन्टासी स्पोर्ट्समध्ये क्रिकेटसह कबड्डी, हॉकी, बास्केटबॉल आणि फुटबॉलयवर देखील गेम्स आहेत. भारतात किमान 15 स्टार्टअप्स फॅन्टासी स्पोर्ट्स श्रेणीत जबरदस्त कामगिरी करत आहेत. त्यातील 3 स्टार्टअप्सने युनिकॉर्न होण्याचा पराक्रम केला आहे. फॅन्टासी स्पोर्ट्समधूल युनिकॉर्न होणारी Dream 11 ही पहिली स्टार्टअप आहे. आर्थिक वर्ष 2021 अखेर  Dream 11 चा एकूण महसूल 2554 कोटी इतका होता.
1920-x-1080-01-1.png
फेडरेशन ऑफ इंडियन फॅन्टासी स्पोर्ट्स (Federation of Indian Fantasy Sports) या संस्थेने केलेल्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2022 मध्ये फॅन्टासी स्पोर्ट्स इंडस्ट्रीची उलाढाल 6800 कोटींपर्यंत वाढली. आर्थिक वर्ष 2027 मध्ये ही उलाढाल 25300 कोटींपर्यंत वाढेल, असा अंदाज या अहलावात व्यक्त करण्यात आला आहे. 

आजच्या घडीला फॅन्टासी स्पोर्ट्स खेळणारे 18 कोटी युजर्स आहेत. वर्ष 2027 मध्ये यात तब्बल तीन पटीने वाढ होण्याची शक्यता आहे. वर्ष 2027 मध्ये भारतात 50 कोटी युजर्स फॅन्टासी स्पोर्ट्स खेळतील, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

फॅन्टासी स्पोर्ट्समध्ये प्रत्यक्ष क्रिकेट मॅच सुरु होण्यापूर्वी युजरकडून टीमची निवड करुन त्यात सहभाग घेतला जातो. यासाठी एन्ट्री फी भरावी लागते. जितके जास्त युजर असतात तितकी बक्षिसाची रक्कम मोठी असते. टीम निवडीनंतर प्रत्यक्ष मॅचमध्ये निवडलेल्या खेळाडूंच्या कामगिरीनुसार युजर्सला पॉइंट मिळतात.जास्त स्कोअर असल्यास त्यावर रोख बक्षीस दिले जाते. फॅन्टासी गेम लाईव्ह मॅचनुसार खेळले जातात. 
 
भारतात फॅन्टासी स्पोर्ट्स इंडस्ट्रीजचे एकूण व्हॅल्यूएशन 75000 कोटींच्या आसपास आहे. ही इंडस्ट्री ज्या वेगाने वाढत आहे त्याच वेगाने यात गुंतवणूक देखील होत आहे. त्याशिवाय सरकारला कर स्वरुपात हजारो कोटींचा महसूल मिळत आहे. अ‍ॅपबेस गेम्समुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात हजारो रोजगार निर्माण झाले आहेत. आर्थिक वर्ष 2022 अखेर  फॅन्टासी स्पोर्ट्स इंडस्ट्रीजमध्ये 12000 थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार आहेत.

आर्थिक जोखीम असल्याने सावध खेळा

फॅन्टासी स्पोर्ट्स खेळणाऱ्या युजर्सची संख्या दिवसागणीक वाढत आहे. यात तरुणांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. एन्ट्री फी भरावी लागत असल्याने यातून युजर्सला सवय लागण्याची शक्यता आहे. फॅन्टासी स्पोर्ट्सबाबत भारतात कोणतेही ठोस आणि व्यापक नियमावली नाही, ज्यात या खेळात सहभागी होणाऱ्या युजर्सला काही गैरप्रकार झाल्यास दाद मागता येईल. या  खेळात आर्थिक जोखीम असल्याने अशा खेळांबाबत सावध राहण्याचा सल्ला जाणकारांकडून दिला जातो. 

फॅन्टासी स्पोर्ट्स कंपन्यांची IPL मुळे होणार चांदी

  • इंडियन प्रिमीयर लिगच्या यंदाच्या 2023 च्या हंगामात प्रेक्षकांचा रेकॉर्डब्रेक प्रतिसाद मिळण्याचा अंदाज आहे. 
  • IPL मुळे क्रिकेट गेम्समध्ये असणाऱ्या फॅन्टासी स्पोर्ट्स कंपन्यांची चांदी होणार आहे. 
  • 'रेडसीर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट'नुसार फॅन्टासी क्रिकेट या ऑनलाईन गेम्स खेळणाऱ्या युजर्सच्या संख्येत यंदा प्रचंड वाढ होईल. 
  • फॅन्टासी क्रिकेट गेम्स यंदाच्या हंगामात 2900 ते 3100 कोटींपर्यंत वाढतील, असे 'रेडसीर'चे पार्टनर उज्वल चौधरी यांनी सांगितले. 
  • यंदा फॅन्टासी क्रिकेट गेममधील उलाढाल 30 ते 35% ने वाढेल, असे चौधरी यांनी म्हटले आहे.  
  • याचे कारण प्रत्येक युजरकडून मिळणारा महसूल वाढणार आहे. 
  • यंदा फॅन्टासी क्रिकेट खेळणाऱ्या युजरकडून कंपन्यांना सरासरी 440 रुपये उत्पन्न मिळेल. वर्ष 2022 मध्ये हे प्रमाण 410 रुपये इतके होते. 
  • IPL वर आधारित Dream 11, मोबाईल प्रिमीयर लीग (MPL), WinZo, My11Circle, Gamezy, Howzat या कंपन्या आहेत. 
  • याशिवाय MY Team 11, Fanmojo, Playerzpot, Fantasy Power 11, Halaplay अशा फॅन्टासी अ‍ॅपमध्ये वेगवेगळे गेम्स उपलब्ध आहेत. 
  • यात सहभागी होण्यासाठी एंट्री फी भरावी लागते. विजेत्यांना बक्षीसे देखील दिली जातात.