Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is CBDC? सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे नेमकं काय, जाणून घ्या सोप्या शब्दांत

CBDC

What is CBDC : सीबीडीसी म्हणजे आपल्या पारंपरिक चलनाचे डिजिटल स्वरुप. सध्या आपल्या रोख व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या चलनी नोटा आणि नाणी याप्रमाणे डिजिटल चलन सुद्धा आर्थिक व्यवहारांसाठी वापरता येईल.

रिझर्व्ह बँकेने डिजिटल रुपीची घोषणा केल्यांनतर मागील दोन दिवस भारतीयांसाठी CBDC (सीबीडीसी) अर्थात डिजिटल रुपया कुतुहलाचा विषय बनला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील अर्थसंकल्पातच रिझर्व्ह बँक डिजिटल रुपया आणेल, अशी घोषणा केली होती. अखेर १ नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँकेने डिजिटल प्रायोगिक वापरास सुरुवात केली आहे. यामुळे तुम्हालाही हे CBDC म्हणजे नक्की काय असत, असा प्रश्न पडला असेल. त्या विषयी अधिक जाणून घेऊया.

सीबीडीसी अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (Central Bank Digital Currency). कोणत्याही देशाची मध्यवर्ती बँक स्वत:चे डिजिटल चलन जारी करते, तेव्हा त्याला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणतात. सीबीडीसी म्हणजे आपल्या पारंपरिक चलनाचे डिजिटल स्वरुप. सध्या आपल्या रोख व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या चलनी नोटा आणि नाणी याप्रमाणे डिजिटल चलन सुद्धा आर्थिक व्यवहारांसाठी वापरता येईल. ऑनलाईन पेमेंटसाठी आताही UPI, RTGS, NEFT सर्रास वापरले जातात. आता यासाठी आणखी पर्याय म्हणजे डिजिटल रुपी उपलब्ध झाला आहे. 

होय RBI डिजिटल करन्सी अधिकृत 

‘आरबीआय’ने जारी केलेल्या डिजिटल करन्सीला आर्थिक व्यवहारांसाठी चलन म्हणून कायदेशीर मान्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी जाहीर करताना '' आज मध्यरात्री यानी  १२ बजेसे ५०० रुपये और १००० रुपये के करन्सी नोट लिगल टेंडर नही रहेंगे'' अशी घोषणा केली होती.  थोडक्यात भारत सरकारचं आणि रिझर्व्ह बँकेची हमी असल्याने हे चलन स्वीकारायला कुणी नकार देऊ शकत नाही. CBDC ची प्रायोगिक तत्वावर चाचपणी सुरु आहे. या पथदर्शी सर्वेक्षणात सहभागासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने नऊ बँकांना केल्या आहेत. ज्यामध्ये  स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक मिहद्र बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी अशा प्रमुख सरकारी, खासगी तसेच विदेशी बँकेचा समावेश झालेला आहे.  

क्रिप्टोकरन्सी आणि CBDC यात फरक आहे का?

क्रिप्टोकरन्सीच्या तुलनेत सेंट्रल बँक डिजिटल करन्सी वेगळी आहे. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ही क्रिप्टो करन्सी नाही.  क्रिप्टोकरन्सींचे वेगळे विश्व आहे. त्यांचा मूळ स्त्रोत गोपनीय असतो. डिजिटल करन्सीच्या बाबतीत असे होत नाही. केंद्रीय बँक डिजिटल करन्सी इश्यू करते. त्यामुळे सीबीडीसीचे होणारे व्यवहार पारदर्शक असतील. क्रिप्टोमध्ये मात्र व्यवहारांची माहिती लपवली जाते. सीबीडीसीला रोखीमध्ये सहज परावर्तीत करता येऊ शकते. क्रिप्टोकरन्सीला अजूनही कायदेशीर मान्यता नसल्याने त्याला रोख रकमेत बदलता येत नाही.