जर तुम्हाला ब्रॉडबँड प्लॅनसोबत मनोरंजनाचाही आनंद लुटायचा असेल तर तुमच्यासाठी एक्साइटलने भव्य ऑफर लॉन्च केली आहे. यामध्ये कमी किंमतीत अनलिमिटेड हायस्पीड डेटा मिळत आहे. एक्साइटलची ही ऑफर खूप चर्चेचा विषय बनली आहे. आज आम्ही तुम्हाला या विशेष प्लॅन विषयी सांगणार आहोत. कंपनीकडून 30 रुपयांच्या रिचार्जमध्ये 4 ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळत आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना मोफत ओटीटी सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे. हा एक अॅड ऑन प्लॅन आहे. ज्याला डेटा पॅक सोबत रिचार्ज करता येईल.
भारताच्या मोठ्या ब्रॉडबँड प्रोव्हायडर्समध्ये एक्साइटलची गणती होते. कंपनीकडून 4 ओटीटी अॅड ऑन प्लॅन लॉन्च करण्यात आले आहेत. हे प्लॅन 30 रुपये, 60 रुपये, 100 रुपये आणि 200 रुपयांमध्ये येतात.
Table of contents [Show]
30 रुपयांचा प्लॅन (30 Rupees Plan)
30 रुपयांच्या या प्लॅन मध्ये यूजर्सना EpicOn, ShemarooMe, Hungama Play, Hungama Music, ALT Balaji यांसोबत Play box TV चे सब्सक्रिप्शन मिळते. याची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. हा एक बेस ओटीटी ऑन प्लॅन आहे.
60 रुपयांचा प्लॅन (60 Rupees Plan)
या प्लॅनमध्ये युजर्सना ZEE5, SonyLIV आणि Playbox TV सब्सक्रिप्शन मिळतं. याची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे.
100 रुपयांचा प्लॅन (100 Rupees Plan)
या प्लॅनमध्ये युजर्सना ZEE5, SonyLIV, EpicON, ShemarooMe,Hungama Play, Hungama Music, ALT Balaji आणि Play box TV चे मोफत सब्सक्रिप्शन मिळत आहे. युजर्सना हा प्लॅन खूप आवडत आहे. याची व्हॅलिडीटीसुद्धा 30 दिवसांची आहे.
200 रुपयांचा प्लॅन (200 Rupees Plan)
200 रुपये खर्च करुन युजर्सना या प्लॅनमध्ये ZEE5, SonyLIV, Disney+Hotstar, EpicON, ShemarooMe, Hungama Play, Hungama Music, ALT Balaji यांसोबत Play box TV चे सब्सक्रिप्शन मोफत मिळते. याचीसुद्धा व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे.
अधिक माहितीसाठी https://www.excitel.com या वेबसाईट लिंकवर क्लिक करा.