पारंपरिक इंधनाचे साठे कधीतरी संपणारच आहेत. पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू कधीतरी संपुष्टात येणारच. ही जाणीव असल्याने जगभरात पर्यायी ऊर्जेच्या स्रोतांचा वापर वाढत आहे. सोबतच प्रदूषण जागतिक तापमानवाढ हे प्रश्नही गंभीर होत चालले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. भारतामध्ये २०३० सालापर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची एकंदर बाजारपेठ १०० अब्ज डॉलर होणार असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
सुमारे ५० टक्के दुचाकी असतील इलेक्ट्रिक (around half two Wheller will be EV)
२०३० सालापर्यंत रस्त्यावर ४० ते ४५ टक्के दुचाकी तसेच १५ ते २० टक्के चारचाकी गाड्या दिसली, असे ब्रेन अॅन्ड कंपनीने केलेल्या अहवालात म्हटले आहे. दरवर्षी सुमारे १ कोटी ३० लाख दुचाकी आणि १ कोटी चारचाकी इलेक्ट्रिक वाहने विकली जातील, असे अहवालात म्हटले आहे. फक्त वाहनांची विक्रीच नाहीतर कच्चा माल पुरवठा साखळी, बॅटरी निर्मिती, छोटे मोठे स्पेअर्स पार्ट पुरवणाऱ्या कंपन्या यांची उलाढाल १०० अब्ज अमेरिकी डॉलर असेल, असे अहवालात म्हटले आहे.
इव्ही वाहनांच्या किंमती आवाक्यात (EV at affordable price)
कच्च्या मालाच्या किंमती आणि महागाई वाढल्यामुळे चालू वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती देखील वाढल्या. बॅटरीची किंमत देखील वाढली. मात्र, तरीही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपन्यांना सरकारकडून अनुदान दिले जाते. दिल्लीमध्ये हाय स्पीड इलेक्ट्रिक टु व्हिलरची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकीपेक्षा फक्त १५ ते २० टक्के जास्त आहे, असे अहवालात म्हटले आहे.
अवजड वाहन श्रेणीमध्येही इलेक्ट्रिक गाड्यांचे प्रमाण वाढेल (EV Hevey vehicle will increase)
फक्त चारचाकी किंवा दुचाकीच नाही तर इलेक्ट्रिक जड वाहनांचीही विक्री वाढेल. हलक्या सामानाची वाहतूक करणारी इलेक्ट्रिक वाहने 2030 पर्यंत २५ टक्क्यांनी वाढतील. बसची संख्या २० टक्क्यांपर्यंत असेल तर अवजड सामानाची वाहतूक करणाऱ्या गाड्या ५ टक्के इलेक्ट्रिक असतील, असे अहवालात म्हटले आहे. इव्ही वाहन निर्मिती क्षेत्राची वाढ होण्यासाठी कंपन्यांना सॉफ्टवेअर क्षमता, सिस्टिम इंटिग्रेशन, इव्ही वाहन विक्रीसाठी बाजारपेठ निर्मिती, पुरवठा साखळी, शाश्वत आर्थिक विकास, इतर कंपन्यांचा सहभाग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षितता यावर काम करावे लागणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. सुरक्षितता ही ग्राहकांसाठी मोठा चिंतेचा विषय आहे. मागील काही दिवसांत अनेक इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या घटना घडल्या.