Online Yoga: करोना काळात सर्वकाही ऑनलाईन झाले होते. शाळा, कोर्सेस, कार्यशाळा, मिटींग, ऑफिसचे काम अगदी सगळ्यात गोष्टी स्क्रिन समोरच सुरू होत्या. त्यात इम्युनिटीसाठी योगा बेस्ट आहे, असे सगळेजण बोलत होते, पण योगा क्लासेस सुरूच कुठे होतो. ते सुरू होते ऑनलाईन त्यामुळे सगळ्यांनी ऑनलाईन योगा क्लास लावला. काही काळाने निर्बंध उठले मग दुसरी लाट आली, तीही क्षमली. त्यानंतर आत्तापर्यंत कोणतेच निर्बंध नाहीत. ऑफलाईन योगा क्लास, जीम, फिटनेस क्लासेस सुरू झाले आहेत, तरीदेखील ऑनलाईन योगा क्लास बंद झालेले नाहीत, उलट त्यांची संख्या अजुनही वाढत आहे.
ऑनलाईन योगा क्लास वाढण्यामागील कारणे (Rise of online yoga classes)
आपली जीवनशैली बदलत आहे, आपण अधिक अपग्रेड होत आहोत, मात्र त्याचवेळी जीवनशैली आजारांनी आपल्याला त्रस्त केले आहे. त्यात महामारीसारखे मोठे संकट येऊन गेले , त्यामुळे प्रत्येक व्यक्ती अधिकच आरोग्याच्या प्रती जागरुक झाली आहे. आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यात व्यायाम करण्यासाठी सकाळी लवकर उठण्याची प्रेरणा, आवरुन बाहेर पडून क्लासला जाणे हे अनेकांना शक्य होत नाही. सध्या कामाचे तास वाढले आहेत, रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते अशावेळी सकाळी लवकर उठून क्लासला जाणे अनेकांना शक्य होत नाही, त्यामुळे बहुतांश व्यक्तींसाठी ऑनलाईन क्लास सोयीचा ठरतो. त्यामुळे ऑनलाईन क्लासची संख्या कमी न होता, ती वाढत आहे, असे योगा प्रशिक्षक सिद्धिका गायकवाड यांनी सांगितले.
कांदिवली येथील योगिक हिलिंग योगा क्लासच्या इना किकाणी यांनी सांगितले की, करोनाचे निर्बंध उठल्यानंतर, म
माझे योगा ऑफलाईन क्लास सुरू झाले, मात्र ज्यांना शक्य होत नाही ते माझ्या फेसबूक लाईव्ह व्हिडीओ पाहून घरीच योगा करतात. यांची संख्या साधारण 60 आहे, दिवसाला 60 विद्यार्थी घरातून लाईव्ह योगा क्लास अटेंड करून योगाभ्यास करतात.
स्किल्स कल्टीव्हेटरचे मार्केटींग व्यवस्थापक आशिष के. मेहता सांगतात की, या प्लॅटफॉर्मद्वारे 2021 मध्ये 12
योग शिक्षक योगा क्लास घेत होते. तर, 2022 मध्ये हा आकडा 35 झाला आहे, 35 शिक्षक रोज योगा क्लास घेतात. यात काहीजण ग्रुपने क्ला करतात तर काहीजण वैयक्तिक क्लास करतात.
येत्या काळात ऑनलाईन शिक्षणाचे प्रस्थ वाढणार आहे. ऑनलाईन योगा करणे सोप्पे जात असल्यामुळे नागरिक याचा फायदा घेतात, घरातील मंडळी एकत्रदेखील हा क्लास करतात. ऑनलाईन योगा क्लासची फी 300 रुपयांपासून 1 हजार 200 रुपयांपर्यंत आहे. तर ऑफलाईन क्लासची फी कमीत कमी 500 रुपयांपासून सुरू होते. पैशांची बचत, योगामुळे फिटनेस, वेळेचे व्यवस्थापन अशा सर्व कारणांमुळे ऑनलाईन योगा क्लास करण्याकडे नागरिकांचा कल आहे, असे आशिष के. मेहता यांनी म्हटले.