Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EV Sale: इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत यंदा 2000% वाढ होणार, देशात तब्बल 18 लाख वाहनांची झालीय नोंद

auto

देशात इलेक्ट्रिक व्हेइकलच्या विक्रीत मागील वर्षभरात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले आहे. टाटा, महिंद्रांपासून लक्झरी कार्स उत्पादकांनी ईव्ही मॉडेल्सला प्राधान्य दिले आहे.

पेट्रोल आणि डिझेल महागाईने हैराण झालेल्या ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिल्याचे दिसून आले आहे. यंदा इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्री 2019 च्या तुलने 2000% वाढ होण्याची शक्यता आहे.

कार्बन उत्सर्जन 2030 पर्यंत कमी करण्यासाठी ईलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. येत्या 2030 पर्यंत शून्या कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यामुळे नव्याने बाजारात दाखल होणारी वाहने ही विजेवर चालणारीच असतील याकडे सरकार देखील लक्ष ठेवून आहे.

वर्ष 2022 हे इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेसाठी प्रचंड वृद्धी नोंदवणारे ठरले आहे. 2019 पासून वाहन विक्री सातत्याने वाढ होत आहे. 9 डिसेंबर 2022 अखेर देशात 442901 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाल्याची माहिती सरकारने दिली आहे. यंदा ईव्ही वाहनांच्या विक्री 2218% वाढ झाली आहे. सरकारच्या FAME India योजनेत 7.47 Lakh EV's ची नोंदणी झाली आहे. यातील निम्म्याहून अधिक वाहने तीनचाकी आहेत जे मालवाहतुकीसाठी वापरली जातात. 8 लाख इलेक्ट्रिक बाईक्स असून भारतात 5151 इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग स्टेशन्स कार्यरत आहेत. 

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत 18 लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे. त्यात उत्तर प्रदेशात सर्वाधिक 23% इलेक्ट्रिक वाहने आहेत. उत्तर प्रदेशातील वाहनांची संख्या 4.1 लाख इलेक्ट्रिक वाहने आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 660 ईव्ही स्टेशन्स कार्यरत आहेत, असे गडकरी यांनी सांगितले.