Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Layoff : खर्चात कपात करावीच लागणार म्हणत कंपनीनं 250 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं!

Layoff : खर्चात कपात करावीच लागणार म्हणत कंपनीनं 250 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं!

Layoff : खर्चाचं कारण देत आता भारतातल्या एका कंपनीन आपल्या 250 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय. इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप यूलर मोटर्सनं आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढलंय. एकूण कर्मचाऱ्यांच्या हे 10 टक्के एवढे प्रमाण आहे. सर्वच विभागांमध्ये बदल करण्याचं कंपनीनं ठरवलंय, असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय.

यूलर मोटर्स (Euler Motors) ही इलेक्ट्रिक वाहन निर्माण करणारी कंपनी आहे. दिल्लीत कंपनीचं मुख्यालय आहे. या स्टार्टअपच्या (Startup) माध्यमातून रोजगार निर्माण तर झाला. मात्र त्यातल्याच 250 कर्मचाऱ्यांवर आता बेकारीची कुऱ्हाड कोसळलीय. कंपनीनं एका झटक्यात 10 टक्के कर्मचारी काढून टाकले आहेत. या वर्षी कर्मचारी कपात करणारा हा तिसरा ईव्ही (EV) स्टार्टअप ठरला आहे. याआधी ईव्ही स्टार्टअप विभागात बाउन्स आणि ओएलए यांनी कर्मचारी कपात केली होती. या वर्षाच्या जानेवारीत त्यांनी आपल्या काही कर्मचाऱ्यांना कमी (Layoff) केलं होतं. त्या यादीत आता यूलरचाही समावेश झाला आहे.

कर्मचारी कपात करणारा विभागातला तिसरा स्टार्टअप

यूलर मोटर्सला सिंगापूर सोव्हरेन वेल्थ फंड जीआसीचं (Singapore's sovereign wealth fund GIC) सहाय्य आहे. एकीकडे आपलं उत्पादन वाढवायचं आहे, असं कंपनीनं सांगितलंय. तर दुसरीकडे स्टार्टअपच्या स्थितीत असतानाही 250 कर्मचाऱ्यांना काढणं हा एक मोठा आकडा मानला जातोय. रोजगारात अशाप्रकारे कपात केल्यानंतर ही स्टार्टअप कंपनी देशातली दुसरी इलेक्ट्रिक व्हेइकल (EV) निर्माता कंपनी बनलीय.  बाउन्सनंतर या वर्षी यूलरची कर्मचारी संख्या कमी झालीय. विक्री (Sales) आणि संशोधन (Research) आणि विकासाशी (Development) संबंधित होते, असे सूत्रांनी सांगितले.

'वाढत्या व्याजदरामुळे अनेक स्टार्टअप्स अडचणीत'

ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देणं, आपल्या उत्पादनांचं योग्य वितरण तसंच जागतिक सद्यस्थितीच्या संदर्भात कंपनीनं जुळवून घेण्याच्या उद्देशानं हा कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. गुंतवणूकदारांची अपेक्षा पूर्ण करणंही तितकंच गरजेचं आहे. त्या दृष्टीकोनातून सर्वच विभागांचा आढावा आम्ही घेत आहोत. या सर्वांची पुनर्रचना करणं आवश्यक होतं, असं यूलर मोटर्सच्या प्रवक्यानं आपल्या स्पष्टीकरणात सांगितलंय. निधी मिळवणं हे अलिकडच्या काळात अत्यंत कठीण काम होऊन बसलंय. अमेरिकेतल्या (US) वाढत्या व्याजदरामुळे अनेक स्टार्टअप्सना असुरक्षितता जाणवत आहे. सहाजिकच निधीची कमतरता अनेक अडचणींना निर्माण करत आहे, असं प्रवक्त्यानं म्हटलंय.

'निधीच्या कारणास्तव निर्णय'

आम्हाला निधीच्या कारणास्तव हा निर्णय घ्यावा लागतोय. आमच्या स्टार्टअपमध्ये खर्चात कपात करणं, नवे प्रकल्प थांबवणं आणि सध्याचा व्यवसाय योग्य प्रकारे विस्तारित करणं या मुद्द्यांवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. त्यासाठी सुरुवातीला 10 टक्के कर्मचारी कमी करणं आवश्यक होतं. हे स्टार्टअप आहे. यात ज्या कर्मचाऱ्यांची कपात होतेय, त्यांचंही अमूल्य योगदान आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोतच. मात्र यासाठी आम्ही त्यांना योग्य मोबदला दिलाय, असंही या प्रवक्त्यानं सांगितलंय.

मागणी वाढतेय मात्र तोटाही होतोय

न्यूज बाइट्सच्या म्हणण्यानुसार, यूलर मोटर्सच्या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरची मागणी तर वाढतेय मात्र कंपनीचा तोटाही वाढतोय. 2022-23 या आर्थिक वर्षात स्टार्टअपचा तोटा सुमारे 36.3 कोटी रुपयांवर गेलाय. यूलर मोटर्सनं हायलोड ईव्ही 2023 (Highload EV 2023) हा प्रकार लॉन्च केल्यानंतर ही कर्मचारी कपात केलीय. पीव्ही, डीव्ही आणि एचडी या तीन प्रकारांमध्ये हे हायलोड सादर करण्यात आले आहे. नवे मॉडेल 13 kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकसह 170 kmsच्या ARAI-प्रमाणित श्रेणीसह येते.