Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Travel Tips: ट्रिपचं नियोजन कसं करावं? साध्या सोप्या पण 'Must Know' टीप्स

essential Travel Tips

Travel Tips: ट्रिपचं प्लॅनिंग करताना अनेकांचा गोंधळ उडतो. आपण जे नियोजन आखतो त्यानुसार गोष्टी होत नाहीत. ट्रिपचं नियोजन करताना कोणती काळजी घ्यावी हे आपण या लेखात पाहूया. मग ती सोलो ट्रिप असो किंवा कुटुंबासोबत. या ट्रॅव्हल टिप्स फायद्याच्या ठरतील. पाळीव प्राण्यांना बरोबर घेऊन ट्रिपवरती जात असाल तर काय काळजी घ्यावी लागते ते सुद्धा पाहूया.

Essential Travel Tips: आपण एखाद्या गोष्टीचं नियोजन करतो. मात्र, ठरलेल्या प्लॅननुसार होत नाही असा अनुभव प्रत्येकाला कधीतरी आलाच असेल. मात्र, मग त्यामुळे नियोजन करणं सोडायचं का? तर नक्कीच नाही. नियोजनामध्ये अचानक काही बदल करायची वेळ आली तर त्याचंही नियोजन आधीपासून हवं. आता पर्यटन म्हटलं की अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

कोणत्या स्थळांना भेटी देणार आहात. ट्रॅव्हल कशाने करणार आहात? किती व्यक्ती बरोबर आहेत, किती दिवसांचा प्लॅन आहे. राहण्याची व्यवस्था कधी, कुठे ,कशी यासह इतरही अनेक गोष्टींचे नियोजन लागते. कोणत्याही शार्ट किंवा लाँग ट्रिपचं प्लॅनिंग करताना कोणत्या गोष्टी कॉमन असतात ते आपण या लेखात पाहू.

ट्रिपचं नियोजन आधीपासून करून ठेवा

जर तुमची नियोजित ट्रिप असेल तर आधीच सगळं नियोजन करायला हवे. कारण, ऐनवेळी तिकीट बूक होत नाही. तसेच तिकिटांचे दरही जास्त असतात. त्यामुळे शक्यतो कोठेही फिरायला जायचे नियोजन करत असाल तर आधीच तिकीट बूक करून ठेवा. प्रत्येक डेस्टिनेशनवर किती काळ थांबणार आहात. तेथे काय करणार आहात. खर्च किती लागेल याचे प्लॅनिंग करून ठेवा. जर तुम्ही ट्रिपचे दोन ते तीन महिने आधीच नियोजन केले असेल तर तुम्हाला तिकीट स्वस्तात मिळेल.

head-image-3-3.jpg

www.blog.goway.com

लो बजेट ट्रिप असेल तर आगाऊ नियोजन पैसे वाचवण्यास मदत करेल. तसेच ट्रिपसाठी पुरेसे पैसे साठवण्यासाठी वेळ मिळेल. कारण, ट्रिपचा खर्च वगळता अतिरिक्त पैसे तुमच्याकडे हवेत. नियोजित खर्चापेक्षा जास्त खर्च तुम्हाला करावा लागू शकतो. प्रवासात अनेक अडचणी असतात याचा विचार तुम्ही आधीच करायला हवा. सर्वप्रथम तुमचे बजेट ठरवा. त्यानुसार तुम्हाला हॉटेल्स, ट्रॅव्हल मोड सिलेक्ट करता येईल.  

टुरिस्ट डेस्टिनेशनवर रिसर्च करा

ट्रिपवर जाण्याआधी टुरिस्ट डेस्टिनेशनवरील हॉटेलच्या किंमती ऑनलाइन पडताळून पाहा. तेथे गेल्यावर स्थानिक प्रवासासाठी काय सोय उपलब्ध आहे. याबाबत इंटरनेटवर तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकते. नाहीतर ऐनवेळी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. हॉटेल, रिसॉर्ट संबंधित रिव्ह्यू वाचा. युट्यूबवर काही माहिती मिळते का ते पाहा. जर योग्य रिसर्च केला तर नक्कीच तुमचे पैसे वाचतील.

ट्रॅव्हल कीट (Travel kit)

ट्रिपवर जाताना तुमचे ट्रॅव्हल कीट म्हणजेच तुमच्या गरजेच्या गोष्टी बरोबर ठेवा. जसे की, फर्स्ट एड किट, सनस्क्रीन, कॅमेरा, हेडफोन, चार्जर, गाइडबूक, शूज, सिझनुसार कपडे, वॉटर बॉटल, कॅश आणि डिजिटल स्वरुपात पैसे, गाइडबूक अशा गोष्टी बरोबर घ्याव्या लागतील. या व्यतिरिक्तही अनेक गोष्टी आहेत ज्या प्रवास करताना तुम्हाला लागू शकतात. त्याची एक यादी करा आणि चेकमार्क करून पॅकिंग करा.

head-image-2-2.jpg

www.focus.ua

पर्यटन स्थळाविषयी माहिती मिळवा

तुम्ही ज्या पर्यटन स्थळी जाणार आहात तेथील स्थानिक कल्चर बद्दल आधीच माहिती मिळवा. भाषेची अडचण येऊ नये म्हणून काही बेसिक गोष्टी त्या भाषेतील माहिती करून घेतलेले कधीही चांगले राहील. दिशा भटकल्यास किंवा काही अडचण आल्यास स्थानिक लोकांशी संवाद साधणे सोपे जाईल. स्थानिक संस्कृती आणि भाषेबद्दल माहिती नसेल तर सोलो ट्र्रॅव्हल करत असताना जास्त अडचण येऊ शकते.

ट्रॅव्हल इन्शुरन्स

प्रवास करताना ट्रॅव्हल विमा काढण्यास विसरू नका. तुम्ही कोणत्याही मार्गाने प्रवास करत असाल तर हा विमा कामाला येईल. प्रवासात लगेज हरवल्यास, फ्लाइट चुकल्यास किंवा अपघात झाल्यास तुम्हाला विमा संरक्षण मिळेल. एकट्यानेच (सोलो) किंवा कुटुंबासह कसाही प्रवास करत असाल तर ट्रॅव्हल विमा काढण्यास विसरू नका.

सोबत पाळीव प्राणी असेल तर काय काळजी घ्याल

देशांतर्गत विमान प्रवास करताना पाळीव प्राणी बरोबर घेऊन जाऊ शकतो. मात्र, त्यासाठी विमान कंपनीच्या सर्व नियम आणि अटींचे पालन करावे लागते. तसेच पाळीव प्राणी बरोबर घेत असल्याचे कागदपत्रही बाळगावे लागते. एअर इंडियाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार पाच किलोपेक्षा कमी वजनाचा पाळीव प्राणी केबिनमध्येही घेऊन जाऊ शकतो. यासोबत इतरही अनेक नियम आहेत. पर्यटन स्थळावरही पाळीव प्राण्यांना परवानगी आहे की नाही, याची माहिती तुम्ही आधी काढू शकता. श्वान, मांजर किंवा पक्षी विमानात बरोबर घेताना पिंजरा किंवा बॅग मध्ये न्यावे लागेल. तसेच प्राण्यास हवा मिळेल, अशा पद्धतीची सोय असावी.

head-image-1-2.jpg

www.mid-day.com

पर्यटन स्थळावरील कोणत्या हॉटेलमध्ये पाळीव प्राणी नेण्यास परवानगी आहे याची माहिती तुम्हाला ऑनलाइन काढता येईल. रेल्वेमधून पाळीव प्राणी घेऊन जाण्यासही परवानगी आहे. यासंबंधीची नियमावली तुम्हाला रेल्वे खात्याच्या संकेतस्थळावर पाहायला मिळेल.