Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How to Check PF Balance : पीएफ खात्यातील बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या चार सोप्या पद्धती

epf

पीएफ खात्यातील बॅलन्स चेक करण्यासाठी 4 सोप्या पद्धतीचा वापर करता येतो. त्यामध्ये मिस्ड कॉल, SMS च्या माध्यमातून, EPFO च्या संकेतस्थळावर आणि उमंग अॅपवर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासता येते.

तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरी करत असताना तुमच्या पगारातून ठराविक रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या(PF) खात्यामघ्ये जमा होत असते. ईपीएफ(EPF) खात्यात जमा होणारी रक्कम तुमच्या सेवानिवृत्तीनंतरचा एक आधार असते. मात्र, बऱ्याचवेळा आपल्या पीएफ खात्यामध्ये नेमकी किती रक्कम जमा झाली आहे. आपल्या PF खात्यावरील एकूण बँलन्स किती आहे, याबाबतची माहितीच नसते. आज आपण पीएफ खात्यामधील शिल्लक रक्कम कशा पद्धतीने जाणून घ्यायची याबाबतची माहिती जाणून घेऊयात..

4 सोपे पर्याय उपलब्ध 

आजच्या डिजिटलायझेशनच्या (Digitalization) जमान्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यामध्ये किती बॅलन्स शिल्लक आहे, हे घरबसल्या चेक करता येते. तुमच्या पीएफ खात्यातील एकूण रक्कम तपासण्यासाठी 4 सोपे पर्याय उपलब्ध आहेत. दरम्यान,  तुम्ही तुमचा UAN(युनिव्हर्सल अकाउंट नंबर) अॅक्टिव्ह केलेला असणे आवश्यक आहे. तसेच तुमचा मोबाईल क्रमांकही पीए खात्याला लिंक केलेला असावा. एकदा का तुमचा UAN क्रमांक अॅक्टिव्ह झाला की तुम्ही केव्हाही घरबसल्या तुमच्या खात्याची माहिती जाणून घेऊ शकता.

पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?

पीएफ खात्यातील बॅलन्स चेक करण्यासाठी 4 सोप्या पद्धतीचा वापर करता येतो. त्यामध्ये मिस्ड कॉल, SMS च्या माध्यमातून, EPFO च्या संकेतस्थळावर आणि उमंग अॅपवर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासता येते.

मिस्ड कॉल पद्धत-

तुमचा  UAN(युनिव्हर्सल अकाउंट नंबर) अॅक्टिव्ह करत असताना तुम्ही जो मोबाईल क्रमांक पीएफ खात्याशी लिंक केलेला आहे. त्या क्रमांकावरून मिस्ड कॉल करून तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यायचा आहे. एकदा कॉल केला की आपोआप एक रिंग होऊन तुमचा कॉल डिस्कनेक्ट होईल. त्यानंतर 1 ते 2 मिनिटातच तुमच्या त्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर तुम्हाला PF बॅलन्सच्या संपूर्ण तपशीलांसह SMS प्राप्त होईल. त्यामध्ये तुमच्या खात्यात शेवटची जमा झालेली रक्कम आणि एकूण बॅलन्स याबाबतची माहिती तुम्हाला मिळेल. खात्यातील रक्कम जाणून घेण्याची ही सर्वात जलद पद्धत आहे.

SMS पद्धतीने पीएफ बॅलन्स तपासणे-

मिस्ड कॉल देऊन पीएफ खात्यातील रक्कम जाणून घेण्याप्रमाणे तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातूनही तुमच्या खात्यातील रक्कम जाणून घेऊ शकता. याला Short Code SMS Service असे संबोधले जाते. यासाठी तुम्हाला तुमचा UAN क्रमांक माहिती असणे गरजेचे आहे. या पद्धतीने तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून EPFOHO UAN असा SMS 7738299899 या क्रमांकावर पाठवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्हाला SMS च्या माध्यमातून PF बॅलन्सची प्राप्त होईल. यामध्ये आणखी एक सुविधा आहे.ती म्हणजे तुम्ही ही माहिती तुमच्या भाषेतही मिळवू शकता. जसे की तुम्हाला मराठीमध्ये माहिती हवी असल्यास तुम्हाला एसएमएस पाठवताना  'EPFOHO UAN MAR'असा SMS 7738299899 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

EFF संकेतस्थळावर  - Member passbook

वरील दोन पर्याय हे सोपे आहेत. मात्र तुम्हाला तुमच्या खात्याचा पूर्णच तपशील म्हणजेच एकूण रकमेसोबत खात्याचे स्टेटमेंट पाहिजे असेल तर तुम्ही या तिसऱ्या पर्यायाचा वापर करून रक्कम जाणून घेऊ शकता. तुम्हाला तुमचे पूर्ण पासबूक जाणून घेण्यासाठी सुरुवातीला https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/login या संकेतस्थळावर जा. त्या ठिकाणी तुम्ही EPF Passbook & Claim Status या ठिकाणी  UAN आणि पासवर्ड टाकून तुमचे खाते लॉगिन करा. लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामधील संपूर्ण तपशील या ठिकाणी पाहायला मिळेल.  यामध्ये PF चे पैसे कधी आणि किती जमा झाले. एम्पलॉयर चे काँट्रीब्युशन किती आहे, तुमचे किती पैसे जमा झाले ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल. यासाठी तुमचे UAN खाते आधीच रजिस्टर करणे आवश्यक आहे.


उमंग" (UMANG) अॅपच्या माध्यमातून

उमंग अॅप हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या संस्थेचे अधिकृत अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातूनही तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स तपासू शकता. यासाठी तुम्हाला "EPFO" पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर UAN आणि OTP टाकून लॉगिन करा. खाते लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पासबूक तपासून तुमच्या खात्यातील रक्कम जाणून घेता येणार आहे.