Enigma Launched Enigma Ambier N8: सतत फिरण्याचे (फिल्ड वर्क) काम करणारे कर्मचारी, अॅग्रिगेटर्स आणि शहराअंतर्गत दररोज प्रवास करणारे नागरिक तसेच ऑफिसला जाणारा कर्मचारी वर्ग यांना दररोज अनेक किलो मीटर गाडी चालवण्याची आवश्यक्ता भासते. अशातच जर का त्यांच्याकडे इलेक्ट्रिक दुचाकी असली, तर त्यांना ती सतत चार्जिंग करण्याचं एक वेगळं टेन्शन असते. ग्राहकांची ही कमकुवत बाजू लक्षात घेता एनिग्मा कंपनीने 1500 वॅटची बाटरी असणारे Enigma Ambier N8 मॉडेल मार्केट मध्ये लाँच केले.
किंमत काय आहे ?
अँबियर N8 गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 200 किलोमीटर पर्यंतचे अंतर कापते. तसेच या दुचाकीचा ताशी वेग 50 किलोमीटर आहे. Enigma Ambier N8 या इलेक्ट्रिक स्कूटरची दुचाकी किंमत एक्स शोरुम मध्ये 1,05,000 रुपये आहे. तर टॉप व्हेरियंटची एक्स शोरुम किंमत 1,10,000 रुपये आहे. ही गाडी तुम्ही ऑनलाइन देखील बुक करु शकता. ही दुचाकी ग्राहकांसाठी ब्लू, मॅट ब्लॅक, व्हाईट, सिल्व्हर, थंडरस्टॉर्म ग्रे या 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे.
वैशिष्ट्ये काय आहेत ?
Enigma Ambier N8 ही एक हायस्पीड इलेक्ट्रिक दुचाकी आहे. यामध्ये 1500 वॅटची BLDC मोटार लावण्यात आली आहे. या मोटार मुळे या गाडीचा ताशी वेग 50 किलोमीटर आहे. तसेच यामध्ये 63V 60AH बॅटरी देण्यात आली आहे, त्यामुळे ही गाडी एकदा चार्ज केली की 200 किलोमीटर पर्यंत चालते. 63V 60AH ही बॅटरी 4 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होऊ शकते.
कुणाशी होणार स्पर्धा ?
एनिग्मा कंपनीने Enigma Ambier N8 ही स्कूटर लाँच केल्याने आता या दुचाकीची स्पर्धा एक्टिवा, ओला एस1, टिव्हीएसची आयक्युब, एथर आणि बजाज सारख्या इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी सोबत होणार आहे. Ambier N8 या दुचाकीमध्ये 26 लीटरची ट्रंक स्पेस दिलेली आहे. तसेच समोरील बाजूस टेलीस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस कॉइल स्प्रिंग सस्पेंशन देण्यात आले आहे.