Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gratuity Rules: नोकरदारांना ग्रॅच्युइटीचे 'हे' नियम माहिती असायलाच हवेत, जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Gratuity Rules

Gratuity Rules: कोणत्याही कंपनीत सलग 5 वर्ष काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी देण्यात येते. यासंदर्भात काही आवश्यक नियम माहिती असणे गरजेचे असते, ते आजच्या लेखातून जाणून घ्या.

Gratuity Rules: ग्रॅच्युइटी म्हणजे कंपनीत दीर्घकाळ काम केल्याबद्दल मिळणारे बक्षीस होय. त्यासाठी सलग 5 वर्ष एका कंपनीमध्ये कर्मचाऱ्याने काम करणे गरजेचे असते. ग्रॅच्युइटी(Gratuity) ही एका निश्चित सूत्रानुसार दिले जाते. कर्मचार्‍यांच्या पगारातून ग्रॅच्युइटीचा एक छोटासा भाग कापला जातो, मात्र मोठा हिस्सा कंपनीकडून दिला जातो. नोकरी सोडल्यावर किंवा निवृत्तीच्या(Retirement) वेळी ग्रॅच्युइटीची रक्कम देण्यात येते. जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल तर तुम्हाला ग्रॅच्युइटीशी संबंधित काही नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. आजच्या लेखातून याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

हे नियम माहित असायला हवेत

खाजगी किंवा सरकारी कंपनीत 10 किंवा त्याहून अधिक लोक काम करत असतील, तर त्या कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीचा(Gratuity) लाभ द्यावा. कंपनीशिवाय दुकाने, खाणी, कारखाने ही क्षेत्र नियमाच्या कक्षेत येतात. मात्र कोणताही कर्मचारी एखाद्या कंपनीत सलग 5 वर्षे काम केल्यानंतरच त्याला ग्रॅच्युइटीचा हक्क मिळतो. जर एखाद्या कर्मचाऱ्यांची नोकरीही 10 किंवा 20 वर्षांची असेल, तर ग्रॅच्युइटीची रक्कमही चांगली  मिळते.

पात्रतेसाठी किती वर्षाची नोकरी असावी?

तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये किती वर्षे काम केले हे ठरवण्याचेही एक सूत्र(Formula) तयार करण्यात आले आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत 4 वर्षे 8 महिने काम केले असेल, तर त्याची नोकरी पूर्ण 5 वर्षाची मनाली जाते आणि त्याला 5 वर्षानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम देण्यात येते. जर त्याने 4 वर्षे 8 महिन्यांपेक्षा कमी काळ काम केले असेल, तर त्याच्या सेवेचा कालावधी 4 वर्षे म्हणून गणला जातो आणि त्याला ग्रॅच्युइटी मिळत नाही.

नोटीस कालावधी ग्राह्य धरला जातो का?

नोकरदार व्यक्तीचा नोटिस कालावधी(Notice Period) देखील ग्रॅच्युइटीच्या कालावधीमध्ये ग्राह्य धरला जातो. थोडक्यात समजून घेताना, समजा तुम्ही कंपनीत साडेचार वर्षे काम केल्यानंतर राजीनामा दिला आहे, मात्र राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यांचा तुमचा नोटिस कालावधी आहे. अशा परिस्थितीत, तुमच्या नोकरीचा कालावधी केवळ 4 वर्षे 8 महिने इतकाच गणला जाईल म्हणजेच तो 5 वर्षे गृहीत धरण्यात येईल आणि तुम्हाला ग्रॅच्युइटीची रक्कम दिली जाईल.

व्यक्तीचा मृत्यू झाला तर?

नोकरी करत असताना अचानक एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या ग्रॅच्युइटी खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम त्याच्या नॉमिनीला देण्यात येते. अशा वेळी किमान 5 वर्षांच्या नोकरीची अट लागू होत नाही.

गणना कशी केली जाते?

ग्रॅच्युइटीची गणना करण्यासाठी एक सूत्र वापरले जाते, त्यानुसार (शेवटचा पगार) x (कंपनीमध्ये काम केलेली वर्ष संख्या) x (15/26). शेवटचा पगार म्हणजे तुमच्या शेवटच्या 10 महिन्यांच्या पगाराची सरासरी काढण्यात येते. या पगारात मूळ वेतन, महागाई भत्ता आणि कमिशनचा समावेश करण्यात आलेला असतो. 
महिन्यामध्ये रविवारचे 4 दिवस आठवड्याची सुट्टी असल्याने, 26 दिवस मोजले जातात व 15 दिवसांच्या आधारावर ग्रॅच्युइटी मोजली जाते.

कंपनी ग्रॅच्युइटी कायद्यांतर्गत नोंदणीकृत नसेल तर काय?

जेव्हा कंपनी ग्रॅच्युइटी कायद्यांतर्गत(Gratuity Act) नोंदणीकृत नसते, तेव्हा कर्मचारी ग्रॅच्युइटी कायद्यांतर्गत समाविष्ट होत नाही. अशा परिस्थितीत ग्रॅच्युइटी द्यायची की नाही, हा सर्वस्वी कंपनीचा निर्णय असतो. पण तरीही कंपनीला एखाद्या कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी द्यायची असेल, तर त्याचे सूत्र वेगळे असते. अशा वेळी ग्रॅच्युइटीची रक्कम दरवर्षी महिन्याच्या अर्ध्या पगारा  एवढी असते. मात्र या प्रसंगात एका महिन्यातील कामकाजाच्या दिवसांची संख्या 26 नव्हे तर 30 दिवस मोजण्यात येते.

ग्रॅच्युइटी करपात्र असते?

कोणतीही कंपनी कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 20 लाख रुपयांपर्यंत ग्रॅच्युइटी देऊ शकते. ही रक्कम करमुक्त(Tax Free) असून हा नियम सरकारी नोकऱ्या आणि खाजगी नोकऱ्यांना लागू होतो.