Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Elin Electronics IPO : एलिन इलेक्ट्रॉनिक्सच्या आयपीओची निराशाजनक कामगिरी

Elin Electronics IPO

एलिन इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स (Elin Electronics IPO) गुंतवणूकदारांना प्रभावित करू शकले नाहीत. कंपनीचा स्टॉक (Elin Electronics Stock) बीएसईवर 247 रुपयांच्या इश्यू किमतीवरून 1.62 टक्के सूट देऊन 243 रुपयांवर लिस्ट झाला.

एलिन इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स (Elin Electronics IPO) गुंतवणूकदारांना प्रभावित करू शकले नाहीत. कंपनीचा स्टॉक (Elin Electronics Stock) बीएसईवर 247 रुपयांच्या इश्यू किमतीवरून 1.62 टक्के सूट देऊन 243 रुपयांवर लिस्ट झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (NSE – National Stock Exchange) हा शेअर 1.21 टक्क्यांनी घसरून 244 रुपयांवर लिस्ट झाला. एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा शेअर स्टॉक एक्स्चेंजमध्ये 244 रुपयांवर लिस्ट झाला होता पण काही वेळातच हा शेअर 235.35 रुपयांच्या पातळीवर गेला. लिस्टिंगनंतर कंपनीचे मार्केट कॅप 1177 कोटी रुपयांच्या पातळीवर आले आहे. शेअरची बुक व्हॅल्यू 111.68 रुपये आहे. कंपनीने IPO मध्ये 5 रुपये फेस व्हॅल्यूवर 247 रुपयांच्या इश्यू किंमतीवर निधी उभारला होता.

एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ असा झाला सबस्क्राइब

एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा (Allin Electronics) चा आयपीओ (IPO – Initial Public Offering) फक्त 3.09 पट सबस्क्राइब झाला. अनेक ब्रोकरेज हाऊसेस या IPO बद्दल उत्साही होते पण या IPO ला अपेक्षेपेक्षा कमी सबस्क्राइब केले गेले आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (National Stock Exchange) आकडेवारीनुसार, कंपनीच्या IPO ला 1,42,09,386 समभागांसाठी एकूण 4,39,67,400 समभागांसाठी बोली प्राप्त झाली. संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव कोटा 4.51 पट, तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा 3.29 पट सबस्क्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव कोटा 2.20 पट सबस्क्राइब झाला.

कंपनीने एकूण 475 कोटी रुपये उभे केले

या आयपीओ (IPO) च्या माध्यमातून कंपनीने एकूण 475 कोटी रुपये उभे केले आहेत. आयपीओ अंतर्गत रु. 175 कोटी किमतीचे नवीन शेअर्स जारी करण्यात आले आहेत आणि ऑफर फॉर सेल (OFS – Offer for Sale) अंतर्गत रु. 300 कोटी रुपयांची विक्री जारी करण्यात आली आहे. आयपीओ 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत अर्जांसाठी खुला होता.

आयपीओमध्ये गुंतवणूकीचा सल्ला

एलिन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अनेक प्रमुख ब्रँडसाठी दिवे, पंखे आणि स्वयंपाकघरातील उपकरणे तयार करते. कंपनीचे चांगले आर्थिक परिणाम, चांगले व्यवसाय मॉडेल आणि आकर्षक मूल्यांकन यामुळे बहुतांश ब्रोकरेज हाऊसने गुंतवणूकदारांना IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता.