Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Power Bill Hike: महाराष्ट्रात आजपासून वीज दरवाढ लागू

Power Bill Hike

वीज दरवाढ दर पाच वर्षांनी होत असताना, तीनच वर्षात ही दरवाढ का केली गेली आहे हा अनेकांना प्रश्न पडला आहे. कोविड काळात अनेकांची वीज बिलं माफ केल्यामुळे वीज वितरक कंपन्या तोट्यात होत्या. वीज नियामक मंडळाला भाववाढ करण्याची त्यांनी मागणी देखील केली होती.

आधीच महागाईने हैराण असलेल्या जनतेला आता वीज बिल वाढीचा जोरदार झटका लागणार असल्याची बातमी आली आहे. आजपासून राज्यात वीज बिलात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र वीज नियामक मंडळाने घेतला असल्याचे जाहीर केले आहे.

वीज नियामक कायद्यानुसार विजेची दरवाढ ही दर पाच वर्षांनी होत असते. परंतु यावेळी मात्र तीन वर्षांनी ही दरवाढ झाल्यामुळे या निर्णयाच्या विरोधात नागरिकांनी नाराजीचा सूर लावला असल्याचे दिसते आहे.

अशी असेल दरवाढ

पुढील दोनवर्षांसाठी म्हणजेच 2023-24 आणि 2024-25 या वर्षांसाठी ही दरवाढ जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र वीज नियामक मंडळाने (Maharashtra Electricity Regulatory Commission- MERC) 2023-24 साठी 2.9% तर 2024-25 साठी 5.6% दरवाढीला मंजुरी दिली आहे. ही दरवाढ तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

High Tension आणि Low Tension  विजेसाठी वेगवेगळी दरवाढ
उद्योगधंद्यासाठी उच्च दाबाच्या विजेचा वापर होत असतो, यासाठी High Tension (HT) कनेक्शन दिले जाते.नव्या नियमानुसार HT कनेक्शनसाठी 2023-24 साठी 1% आणि 2024-25 साठी 4% वाढ वीज दरवाढ केली गेली आहे.

तसेच कृषीक्षेत्रासाठी ही वीज दरवाढ तब्बल 9% असणार आहे. ही दरवाढ सरासरी असून प्रत्येक वितरक कंपन्यांच्या बाबतीत ही दरवाढ कमी-जास्त प्रमाणात असू शकते.

टाटा पॉवर (Tata Power), बेस्ट (BEST), अडानी इलेक्ट्रिसिटी (Adani Electricity) आणि एमएसईडीसीएलच्या (MSEDCL) या विजवितरक कंपन्या लवकरच बदललेली दरवाढ ग्राहकांना कळवतील.

electricity-price-hike.jpg

काय आहे वीज महागाईचे कारण?

वीज दरवाढ दर पाच वर्षांनी होत असताना, तीनच वर्षात ही दरवाढ का केली गेली आहे हा अनेकांना प्रश्न पडला आहे. कोविड काळात अनेकांची वीज बिलं माफ केल्यामुळे वीज वितरक कंपन्या तोट्यात होत्या. वीज नियामक मंडळाला भाववाढ करण्याची त्यांनी मागणी देखील केली होती. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचा तुटवडा हे देखील कारण सांगितले जात आहे. विजेचा उत्पादन आणि वितरण खर्च वाढल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे वीज नियामक मंडळाने म्हटले आहे.त्यामुळेच तीनच वर्षात वीज दरवाढीचा निर्णय मंडळातर्फे घेण्यात आला आहे. 

ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीच्या झळा

एप्रिल आणि मे महिन्यात कडक्याचा उन्हाळा असण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात एसी, कुलर, फॅन आदींचा वापर वाढत असतो. नेमक्या याच काळात विजबिलात वाढ होणार असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. तसेच शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या विजेच्या दरात देखील मोठी दरवाढ झाल्यामुळे सामान्य जनतेने दरवाढीचा विरोध केला आहे.