Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electric Scooters Price: ग्राहकांच्या खिशाला कात्री! 1 जूनपासून इलेक्ट्रिक दुचाकी महाग होणार?

electric two wheeler

तुम्ही जर इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जास्त पैसे मोजायला तयार रहा. 1 जूनपासून इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी दरवाढीची घोषणा केली आहे. ही दरवाढ विविध मॉडेल्सवर 30 हजारांपेक्षाही जास्त असू शकते.

Electric Scooters Price Hike: तुम्ही जर इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जास्त पैसे मोजायला तयार रहा. 1 जूनपासून सर्वच इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी दरवाढीची घोषणा केली आहे. ही दरवाढ 30 हजारांपेक्षाही जास्त असू शकते. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदान कपातीमुळे दरवाढ होणार आहे. 

सरकारकडून इव्ही कंपन्यांना FAME-II (Faster Adoption of Manufacturing of Electric Vehicles in India) या योजनेंतर्गत अनुदान देण्यात येते. देशात इलेक्ट्रिक दुचाकींचा वापर वाढावा. प्रदूषण कमी व्हावे. तसेच ग्रीन एनर्जीचा वापर वाढावा या उद्देशाने सरकारी पातळीवरुन इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येते. मात्र, मागील काही दिवसांपासून अनुदान कमी करण्याच्या हालचाली सुरू होत्या. 1 जूनपासून अनुदान कमी होत असल्यामुळे आता दरवाढ करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. ओला, बजाज, एथर, टीव्हीस सह इतरही कंपन्यांनी दरवाढ केली आहे. 

अवजड उद्योग मंत्रालयाकडून इलेक्ट्रिक दुचाकी बनवताना 10,000 per kWh एवढे अनुदान देण्यात येते. (Electric Scooters Price Hike) ही रक्कम पूर्वीपेक्षा कमी करण्यात आली आहे. गाडीच्या एक्स शोरुम किंमतीवर पूर्वी 40% अनुदान सरकारकडून मिळायचे. मात्र, ही मर्यादा आता 15% वर आली आहे. त्यामुळे कंपन्यांचा निर्मिती खर्च वाढणार आहे. आधीच इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती तुलनेने जास्त आहेत. त्यात आणखी वाढ होणार आहे.

एथर कंपनीच्या गाड्या 32,500 रुपयांपर्यंत महाग होणार

इलेक्ट्रिक दुचाकी निर्मितीतील आघाडीची कंपनी एथरने 1 जूनपासून दरवाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे. 32,500 पर्यंत इलेक्ट्रिक स्कुटर्सच्या किंमती वाढतील, असे कंपनीने म्हटले आहे. 1 जूनच्या आधी इव्ही दुचाकी खरेदी करणाऱ्यांना गाडी स्वस्तात मिळेल. त्यामुळे त्वरा करा आणि तुमची आवडती इव्ही खरेदी करा, असे कंपनीने म्हटले आहे.

इव्ही कंपन्यांनी अनुदानाशिवाय व्यवसाय करायला शिकावे

एथर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण मेहता यांनी सरकारी अनुदान कमी झाल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Electric Scooters Price Hike) इव्ही दुचाकी उद्योगांनी सरकारी अनुदानाशिवाय व्यवसाय करण्यास शिकावे, असे म्हटले आहे. 2019 नंतर अनुदानाच्या प्रमाणात झालेले बदल त्यांनी निदर्शनात आणून दिले.

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 2019 साली इव्ही दुचाकींवर 30 हजार अनुदान मिळत होते. 2021 साली ते वाढून 60 हजार रुपये झाले. मात्र, आता अनुदान 22 हजार रुपयांवर आले आहे. इव्ही क्षेत्रामध्ये खूप चढउतार होत आहेत. इव्ही कंपन्यांनी त्यांच्या पायवर उभे राहायला शिकावे. सरकारी अनुदान वर खाली होत राहील, असे तरुण मेहता यांनी म्हटले आहे.

FAME अनुदान काय आहे?

FAME म्हणजे Faster Adoption and Manufacturing of Electric and Hybrid Vehicles. ही योजना सरकारने 1 एप्रिल 2019 साली आणली होती. सुरुवातीला फक्त 3 वर्षांसाठी ही योजना होती. मात्र नंतर दोन वर्षांसाठी 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. सध्या या योजनेचा दुसरा टप्पा सुरू असून त्याअंतर्गत 10,000 हजार कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. दोन आणि तीनचाकी खासगी आणि व्यावसायिक वाहन खरेदीवर सरकारकडून अनुदान देण्यात येते.