भारत सरकारकडून अक्षय उर्जा निर्मितीला आणि त्याचा अनिवार्य वापरावर जास्त भर देत आहे. भारतातील एकूण उर्जा निर्मितीमध्ये अपारंपरिक उर्जा निर्मिती क्षेत्राचा वाटा हा 25 टक्के इतकाच आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून सौर उर्जा, पवन उर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी नवनवीन योजनाही राबवल्या जात आहे. त्यामुळे भारतात सध्या अक्षय्य उर्जा ( Renewable energy ) निर्मिती क्षेत्रात गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नुकतेच युरोपियन इंडस्ट्रीयल बँकेकडून भारतात अपारंपरिक उर्जा निर्मिती क्षेत्रात तब्बल 500मिलियन युरोची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. यासाठीची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त CNBC ने दिले आहे.
युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेने (EIB) भारत सरकारला 2023 च्या सुरुवातीला भारतामध्ये ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात 1 अब्ज युरोची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचाच भाग म्हणून EIB कडून पहिल्या टप्प्यात 500 मिलियन युरो निधी देण्यासंदर्भातील अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहे. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेचे उपाध्यक्ष क्रिस पीटर्स यांनी याबाबतची माहिती दिली आहे. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेने आत्तापर्यंत भारतात 4 अब्ज युरोची गुंतवणूक केली आहे.
सौर आणि पवन उर्जा निर्मितीमध्येही गुंतवणूक
EIB भारतात अक्षय्य उर्जा निर्मितीसाठी ग्रीन हायड्रोजन उर्जा निर्मिती प्रकल्प, समुद्र किनारपट्टी भागात पवनचक्की यासह आणि सौर उर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे." युरोपियन खाजगी क्षेत्रातील अनेक कंपन्या भारताच्या ग्रीन हायड्रोजन उर्जा निर्मितीच्या क्षेत्रात गुंतवणुकीची संधी शोधत आहेत. जग सध्या भारताकडे पाहत की भारताने ऊर्जा निर्मितीमध्ये काय उपाययोजना करत आहे याकडे जगाचे लक्ष आहे. तसेच जागतिक वित्तपुरवठा करणाऱ्यांना भारतातील गुंतवणुकीच्या संधीबद्दल भारताने सांगण्याची वेळ आली असल्याचेही, पीटर्स म्हणाले आहेत.