Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PNB: पंजाब नॅशनल बँकेमधून शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी जाणून घ्या सर्व माहिती

PNB Education Loan

PNB Education Loan: गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांकडून शैक्षणिक कर्ज दिले जाते . या उपक्रमात पंजाब नॅशनल बँक आघाडीवर आहे. पीएनबी बँक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देऊन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करते. जाणून घेऊया पंजाब नॅशनल बँकेमधून शैक्षणिक कर्ज घेण्याबाबतची संपूर्ण माहिती.

Punjab National Bank Various Plans: PNB शैक्षणिक कर्जाचे व्याजदर भारतातील सर्वोत्तम संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी इतर बँकांच्या तुलनेत कमी आहेत. पीएनबी एज्युकेशन लोनवरील व्याजदर फ्लोटिंग (floating Interest rate ) आहेत आणि ते एमसीएलआरमधील (MCLR) बदलानुसार बदलत राहतात. म्हणून, PNB शैक्षणिक कर्जाचा व्याज दर 7.55% ते 9.55% च्या दरम्यान असतो.

परतफेडीचा कालावधी जास्त

PNB हा भारतात किंवा परदेशातील शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाचा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण, पंजाब नॅशनल बँक 15 वर्षांपर्यंतच्या परतफेडीच्या कालावधीसह आकर्षक व्याजदरावर विविध प्रकारचे शैक्षणिक कर्ज देते. PNB ही राष्ट्रीयीकृत बँक असली तरी, परदेशात शिक्षण घेण्यासाठी पीएनबी शैक्षणिक कर्जाचे व्याजदर खाजगी बँकांपेक्षा बरेच चांगले आहे. त्यामुळे, बहुतेक विद्यार्थी पीएनबी शैक्षणिक कर्जाकडे आकर्षित होतात.

विविध प्रकारच्या शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध

उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण, प्रमुख संस्थांमधील शिक्षण इत्यादींसाठी PNB एज्युकेशन लोन सोप्या प्रक्रियेद्वारे आणि सुलभ कागदपत्राद्वारे मिळू शकते. अशी सुविधा केवळ भारतातील रहिवाशांसाठीच उपलब्ध नाही, तर परदेशात जन्मलेल्या परंतु भारतात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अशा व्यक्तींना देखील PNB शैक्षणिक कर्ज मिळू शकते.

विविध कर्ज योजना

पीएनबी शैक्षणिक कर्जाअंतर्गत भारतात किंवा परदेशात शिकण्यासाठीची रक्कम बदलते आणि व्याजदरही बदलतो. म्हणजेच, उच्च शिक्षणासाठी PNB शैक्षणिक कर्जानुसार, किमान 8 लाख ते कमाल 60 लाख रुपये मिळू शकतात. विविध प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी विविध प्रकारच्या योजना पीएनबीने जारी केल्या आहेत.

जसे भारतात उच्च शिक्षणासाठी पीएनबी सरस्वती योजना, प्रमुख भारतीय संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पीएनबी प्रतिभा योजना, परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी पीएनबी उडान योजना, भारतातील व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी पीएनबी कौशल योजना, फक्त दिल्लीस्थित विद्यार्थी ज्यांना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायचे आहे; त्यांच्यासाठी पीएनबी योजना, बिहार राज्यातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पीएनबी बिहार विद्यार्थी क्रेडिट योजना आहेत.

शैक्षणिक कर्जाचे फायदे आणि वैशिष्ट्ये

भारतात किंवा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आकर्षक व्याजदरावर कर्ज देते.

तुम्ही किमान 50 हजार आणि कमाल 60 लाख कर्ज मिळवू शकता.

या कर्जाची परतफेड अभ्यासक्रमाच्या कालावधीनुसार करावी लागेल.

अर्जदाराचे किमान वय 16 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असावे.

शैक्षणिक कर्जासाठी किमान व्याज दर 7.55% आहे, जो योजनेनुसार बदलतो.

कर्जदारांना ओव्हरड्राफ्ट आणि टॉप अप सुविधा पुरविल्या जातात.

सवलतीच्या दरात व्याजाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

ऑनलाइन प्रक्रियेद्वारे शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकता.

कॅम्पसबाहेर राहण्याच्या खर्च आणि ट्यूशन खर्च दोन्ही बाबी समाविष्ट आहेत.

कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा

राहण्याचा पुरावा

इनकम सर्टिफिकेट

नवीन वेतन स्लिपसह फॉर्म 16

मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट

अर्जदारासाठी पासपोर्ट अनिवार्य

संबंधित गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र