Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ECB Hike Interest Rate: युरोझोनला महागाईचा विळखा; युरोपीयन सेंट्रल बँकेकडून व्याजदरात मोठी वाढ

ECB Rate Hike

ECB Hike Interest Rate: इंधन पुरवठ्यावरुन रशियाने केलेली कोंडी, डॉलरसमोर युरो चलनात झालेले अवमूल्यन आणि महागाईचा भडका यामुळे संपूर्ण युरोझोन होरपळून निघाला आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँकेला व्याजदरात मोठी वाढ करावी लागली.

रशिया-युक्रेन युद्धानंतर महागाईचा वणवा युरोपात भडकला आहे. तो शमविण्यासाठी युरोपीयन युनियन सेंट्रल बँकेने (ईसीबी) व्याजदरात वाढ केली आहे. युरोपीय सेंट्रल बँकेने व्याजदर 0.75% वाढवला. (ECB Hike Interest Rate by 0.75%) या दरवाढीनंतर बँकेचा मुख्य व्याजदर 1.25% इतका झाला आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर यापुढेही व्याजदर वाढवण्याचे संकेत सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टेन लर्गाड यांनी दिले. (ECB president Christine Lagarde Indicates more hike in near term)

मुख्य व्याजदराबरोबच सेंट्रल बँकेने डिपॉझिट दरात देखील वाढ करुन तो 0.75% केला आहे. याआधी डिपॉझिटवरील व्याजदर दिर्घकाळ शून्य टक्क्यांवर होता. सेंट्रल बँकेने सलग दुसऱ्यांदा  व्याजदर वाढवला आहे. यापूर्वी जुलै 2022 मध्ये 'ईसीबी'ने व्याजदर वाढवला होता. तब्बल 11 वर्षानंतर ईसीबीने व्याजदरात वाढ केली होती. याचे मुख्य कारण म्हणजे युरोपात झपाट्याने वाढणारी महागाई. यामुळे तेथील घरगुती बचतीला मोठा फटका बसला आहे. विशेषत: एनर्जीवरील खर्च तीन पटीने वाढला आहे. यामुळे युरोपातील सामान्य जनतेच्या खर्चात प्रचंड वाढ झाली. महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढवणाऱ्या जगभरातील 40 बँकांच्या पंक्तीत आता युरोपीयन सेंट्रल बँक जाऊन बसली आहे.

ईसीबीच्या व्याजदर वाढीचा फटका युरोपातील एकतृतीयांश जनतेला बसणार आहे. कारण एक तृतीयांश हाऊसहोल्डचे मॉर्टगेज आहे. ज्यामुळे त्यांच्या मासिक खर्चात वाढ होईल. कर्जफेड करताना आता युरोपीयन कर्जदारांना जादा युरोंची तजवीज करावी लागेल. ही व्याजदर वाढ क्रेडीट कार्डधारकांनाही आर्थिक दणका देणार आहे. यामुळे क्रेडिट कार्ड आणि बँक ओव्हरड्राफ्टवरील कर्जदर वाढणार आहे. यापूर्वी जूनमध्ये क्रेडिट कार्डवरील सरासरी वार्षिक कर्जदर 18.56% इतका होता.  बँक ओव्हरड्राफ्टवरील कर्जदर 20.23% इतका होता.

इंधन आणि ऊर्जेच्या वाढत्या किंमतींवर सेंट्रल बँक नियंत्रण आणू शकत नाही, असे मत सेंट्रल बँकेच्या अध्यक्षा क्रिस्टेन लर्गाड यांनी व्यक्त केले. नॅचरल गॅसच्या किंमती करण्यासाठी आपण या क्षेत्रातील बड्या कंपन्यांची समजूत काढू शकत नाहीत किंवा ऊर्जा बाजारपेठेत आपण सुधारणा घडवून आणू शकत नाहीत, अशी हतबलता लगार्ड यांनी यावेळी व्यक्त केली. नॅचरल गॅसच्या किंमती अशाच वाढत राहिल्या तर मंदी दूर नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

रशियाने केलीय कोंडी

रशियाने युरोपचा गॅस पुरवठा खंडीत केला तर युरोपला आशिया, नॉर्वे आणि अमेरिकेतून गॅस पुरवठ्याची पर्यायी सोय बघावी लागेल. संपूर्ण युरोपात गॅसची टंचाई निर्माण झाली तर 2023 मध्ये मंदीचा दाह सोसावा लागेल, असे लगार्ड यांनी सांगितले. ऑगस्टमध्ये युरो झोनमधील महागाईचा पारा 9.1% इतका वाढण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये महागाई दर 8.9% होता.