आयपीओ केवळ 5 जून रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. कंपनीनं आयपीओसाठी प्राइज बँड जाहीर केलाय. स्टॉकची किंमत 270 ते 285 रुपये अशी निश्चित करण्यात आलीय. या आयपीओमध्ये विक्रीसाठी ऑफर (OFS) आणि नवीन इक्विटी शेअर्स दोन्ही असतील. आयपीओ उघडण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये त्याच्या शेअर्सची क्रेझ पाहायला मिळतेय ग्रे मार्केटमध्ये, स्टॉक 50 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेडिंग करताना पाहायला मिळतंय. तो 285 रुपयांच्या वरच्या प्राइज बँडच्या संदर्भात 18 टक्के आहे. म्हणजेच शेअर चांगल्या पद्धतीनं लिस्टेड होणार, असंच दिसतंय. लॉट साइज 52 शेअर्सचा आहे. म्हणजेच किमान 14,820 रुपये गुंतवणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 13 लॉटसाठी 1,92,660 रुपये गुंतवले जाऊ शकतात.
Table of contents [Show]
इश्यू 600 कोटी
आयकेआयओ लायटिंगच्या (IKIO Lighting) आयपीओचा आवाका 600 कोटी रुपयांचा असणार आहे. प्राइज बँडच्या बाबतीत कंपनीचं मूल्य 2200 कोटी रुपये आहे. यामध्ये 350 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. तर कंपनीचे प्रवर्तक ओएफएसच्या माध्यमातून 90 लाख इक्विटी शेअर्स विकतील. कंपनी या माध्यमातून 600 कोटी रुपये उभारणार आहे.
आयपीओच्या माध्यमातून उभारणार पैसा
आयकेआयओ लायटिंग आयपीओच्या माध्यमातून पैसे उभारून कंपनीमध्ये गुंतवणूक करणार आहे. त्याचबरोबर कर्जाची परतफेडही करेल. 50 कोटी रुपयांचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी होणार आहे. 212.31 कोटी रुपयांचा वापर नोएडामध्ये नवीन सुविधा उभारण्यासाठी केला जाईल. उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाणार आहे.
कोणासाठी किती राखीव?
आयकेआयओ लायटिंगच्या आयपीओपैकी 50 टक्के हिस्सा क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी राखीव आहे. 15 टक्के नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी तर 35 टक्के रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी राखीव आहे. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअर्सची लिस्ट 16 जूनला अपेक्षित आहे. शेअर्सची लिस्टिंग बीएसई (BSE) आणि एनएसईवर (NSE) होणार आहे. गुंतवणूकदारांना शेअर्सचं अलॉटमेंट म्हणजेच वाटप 13 जूनला होणार आहे. केफिन टेक या आयपीओचे रजिस्ट्रार आहेत.
आयकेआयओ लायटिंगबद्दल...
आयकेआयओ लायटिंग एलईडी इंटिग्रेटेड लाइटिंग सोल्यूशन्स सुविधा देणारी कंपनी आहे. कंपनीचा नोएडामध्ये 3 आणि उत्तराखंडमध्ये एक प्लान्ट आहे. उत्पादनं डिझाइन करणं आणि विकणं हे कंपनीचं काम आहे. आर्थिक वर्ष 2020मध्ये कंपनीला 21.41 कोटी रुपयांचा नफा झाला होता. 2021मध्ये 28.81 कोटी रुपये आणि 2022मध्ये 50.52 कोटी रुपये नफा कंपनीनं कमावला.