Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming SME IPO: या आठवड्यात तीन आयपीओंमध्ये गुंतवणूक करण्याची संधी

3 SME IPO Open from today

Image Source : www.smefutures.com

Upcoming SME IPO: या आठवड्यात 3 SME आयपीओ (Small Medium Entreprises IPO) ओपन होणार आहेत. यामध्ये इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड (Infollion Research Services Ltd), सीएफएफ फ्ल्युइड कंट्रोल लिमिटेड (CFF Fluid Control Ltd) आणि कॉमरेड अप्लाईंनसेस लिमिटेड(Comrade Appliances Ltd) या कंपन्यांचा समावेश आहे.

Upcoming SME IPO: या आठवड्यात 3 SME आयपीओ (Small Medium Entreprises IPO) ओपन होणार आहेत. यामध्ये इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड (Infollion Research Services Ltd), सीएफएफ फ्ल्युइड कंट्रोल लिमिटेड (CFF Fluid Control Ltd) आणि कॉमरेड अप्लाईंनसेस लिमिटेड(Comrade Appliances Ltd) या कंपन्यांचा समावेश आहे. यातील इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस कंपनी आणि कॉमरेड अप्लाईंनसेस लिमिटेड कंपनीचा आयपीओ आजपासून (दि.29 मे) गुंतवणुकीसाठी ओपन होत आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या एसएमई (SME) प्लॅटफॉर्मवरून या आठवड्यात लहान आणि मध्यम कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी मिळत आहे. नियमित आयपीओ प्रमाणेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये या आयपीओंचे ओपनिंग होते.

SME IPO म्हणजे काय? 

100 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या ज्या कंपन्या बाजारातून भांडवल उभे करण्यासाठी आयपीओ आणतात. या कंपन्यांच्या आयपीओला SME IPO असे म्हटले जाते. या कंपन्यांसाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange-NSE) आणि बीएसई (Bombay Stock Exchange-BSE)वर 2012 मध्ये  दोन एक्सचेंज सुरू करण्यात आली आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर BSE SME आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर NSE EMERGE असे प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मवर SME IPOचे लिस्टिंग होते.

SME IPO मध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. पण या कंपन्यांबद्दल अधिक माहिती उपलब्ध नसल्यामुळे याची संपूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते. तसेच यामध्ये योग्य माहितीच्या गुंतवणूक केली असता गुंतवणूकदारांना चांगला परतावादेखील मिळू शकतो.

Infollion Research Services 

इन्फोलियन रिसर्च कंपनीचा आयपीओ आजपासून गुंतवणुकीसाठी ओपन होत आहे; तो 31 मे पर्यंत खुला असणार आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनीने 21.45 कोटी रुपये मिळवण्याचा अंदाज वर्तवला आहे. याच्या 1 लॉटमध्ये 1,600 शेअर्स असणार आहेत आणि याची प्राईस बॅण्ड 80 ते 82 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये किमान 1,31,000 रुपये गुंतवावे लागणार आहेत. कंपनीने निश्चित केलेल्या किमतीनुसार एका शेअरची किंमत 82 रुपये आहे आणि एका लॉटमध्ये 1,600 शेअर्स असणार आहेत. म्हणजेच किमान गुंतवणुकीसाठी 1 लाख 31 हजार रुपये लागणार आहेत.

Comrade Appliances 

कॉमरेड अप्लाईंनसेस कंपनीचा आयपीओदेखील आजपासून ओपन होत आहे. तो 31 मे पर्यंत खुला असणार आहे. कंपनीने प्रति शेअर्सची किंमत 52 ते 54 रुपये निश्चित केली आहे. तसेच एका लॉटमध्ये 2,000 शेअर्स असणार आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांना किमान एका लॉटसाठी 1,08,000 रुपये गुंतवावे लागणार आहेत. कॉमरेड कंपनी या आयपीओच्या माध्यमातून किमान 12.30 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करत आहे. 

CFF Fluid Control 

सीएफएफ फ्ल्युइड कंट्रोल कंपनीच्या मंगळवारपासून (दि. 30 मे) ओपन होणार असून, तो शुक्रवारी (दि. 2 जून) बंद होईल. कंपनीने या आयपीओच्या माध्यमतून 85.80 कोटी रुपये उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच आयपीओसाठी कंपनीने प्रति शेअर्सची किंमत 165 रुपये निश्चित केली आहे. एका लॉटमध्ये 800 शेअर्स असणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 1,32,000 रुपये लागतील.

Source: www.moneycontrol.com