शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण कष्ट करतात आणि यात यश मिळाल्यास कोणतीही सरकारी नोकरी करायला तयार असतात. पण आजकाल तुम्हाला अशा अनेक बातम्या वाचायला किंवा ऐकायला मिळतात की लोक चांगल्या पगाराची नोकरी सोडून तरुण स्वतःहून काहीतरी वेगळा मार्ग निवडतात आणि त्यात यशस्वीही होतात. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील राठोरा गावात राहणाऱ्या गौतम चौधरीचीही अशीच कहाणी आहे. या व्यक्तीने MNC मधील नोकरी सोडून मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरु केला आणि आज तो यातून लाखोंची कमाई करत आहे.
Table of contents [Show]
अशी झाली व्यवसायाला सुरुवात (How The Business Started)
मत्स्यपालन क्षेत्रात येण्यापूर्वी गौतम एका MNC मध्ये नोकरी करत होता. बागपत जिल्ह्यातील माशांची वाढती मागणी लक्षात घेऊन गौतमने या व्यवसायाला सुरुवात केली.जमीन आणि गोड्या पाण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्याने एक हेक्टरमध्ये हौदात 15000 माशांचा साठा करून मत्स्यपालन सुरू केले.
लाखोंचा कमावला नफा (Earned Profit in Lakhs)
गौतमने या शेतीसाठी पूरक खाद्य देऊन 5000 किलो माशांचे उत्पादन केले आहे. त्याने फार्मा कंपन्यांना औषध उत्पादनासाठी 100 रुपये प्रति किलो दराने मासे विकले आणि 5 लाख रुपयांची एकूण उलाढाल व 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. पुढच्या वर्षी, त्याने 3.8 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला, वर्षभरात त्याच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली.
नऊ लाख रुपयांची गुंतवणूक (Investment of 9 Lakhs Rupees)
सरकारी योजनांची माहिती घेऊन त्याने 2019-20 या आर्थिक वर्षात ब्लू रिव्होल्यूशन अंतर्गत अर्ज केला व 1 हेक्टर क्षेत्रात लागवडीस मंजूरी मिळवली यानंतर त्याने मत्स्यपालनासाठी 0.25 हेक्टरमध्ये चार हौद तयार केले व 9 लाख रुपये गुंतवणूकीतून या व्यवसायाला सुरुवात केली.
वार्षिक 24 लाख रुपयांची कमाई (An Annual Income of 24 Lakhs)
नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, गौतम मत्स्यपालन आणि मोत्यांच्या शेतीतून वार्षिक 24 लाख रुपयांचा व्यवसाय करत आहे. त्यांने 12 जणांना रोजगारही दिला आहे.
www.zeebiz.com