Ducati Bikes in India 2023: मध्ये बाइक घेण्याचे स्वप्न असेल, तर थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण डुकाटी कंपनी आपल्यासाठी एक नाही, तब्बल नऊ पर्याय घेऊन येत आहे. यावर्षी ही कंपनी चक्क 9 बाइक्स(Ducati Bikes) भारतात लाँच करणार आहे. या बाइकची नावे व किंमती जाणून घेऊयात.
बाइक्सची नावे व किंमती
इटालियन सुपरबाइक निर्माती कंपनी डुकाटीने या नऊ गाडया लाँच करणार असल्याची घोषणा मंगळवारी केली आहे. या बाइकची नावे मॉन्स्टर एसपी, डायव्हेल व्ही 4, पॅनिगेल व्ही 4 आर, स्ट्रीटफायटर व्ही 4 एसपी 2, मल्टीस्ट्राडा व्ही 4 रॅली, , स्क्रॅम्बलर फुल थ्रॉटल 2 जी, स्क्रॅम्बलर नाईटशिफ्ट 2 जी आणि स्ट्रीटफायटर व्ही 4 लॅम्बोर्गिन, स्क्रॅम्बलर आयकॉन 2 जी अशी आहेत. या गाडयांच्या किंमती 10.39 लाख रुपये ते 72 लाख रुपयांच्या दरम्यान असणार आहेत.
9 बाइक्स लाँच होण्याची प्रक्रिया
नवीन 9 डुकाटी बाइक्स आणि भारतातल्या 2 नवीन डीलरशिप्सची घोषणा कंपनीने केली आहे. यावेळी कंपनीनेव्दारे सांगण्यात आले की, लवकरच चंदीगड आणि अहमदाबाद येथे डुकाटीचे डीलरशिप्स सुरू करण्यात येणार आहे. 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत मॉन्स्टर एसपी 15.95 लाख रुपये इतक्या किंमतीत लाँच केली जाईल. त्यानंतर Panigale V4R बाजारात दाखल करण्यात येणार असून, या बाइकची किंमत साधारण 69.99 लाख रुपये इतकी असणार आहे. तिसऱ्या तिमाहीत स्ट्रीटफायटर व्ही 4 एसपी 2 ही बाइक 35.33 लाख रुपयांत लाँच केली जाणार आहे. त्यानंतर Diavel V4 ही बाइक 25.91 लाख रुपयात दाखल होईल. चौथ्या तिमाहीत मल्ट्रीस्ट्राडा व्ही 4 रॅली ही बाइक 29.72 लाख रुपयात, स्क्रॅम्बलर 2 जी रेंजमधील आयकॉन 2 जी ही गाडी 10.39 लाख रुपयात, फुल थ्रॉटल 2 जी ही बाइक 12 लाख रुपये आणि नाईटशिफ्ट 2 जी ही गाडी 12 लाख रुपयात बाजारात विक्रीसाठी येतील.
भारतातील सर्वाधिक महागडी बाइक
स्ट्रीटफायटर व्ही 4 लॅम्बोर्गिनी 72 लाख रुपये इतक्या किंमती लाँच करण्यात येणार आहे. ही बाइक भारतातील सर्वाधिक महागडी असणार आहे.