Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ducati Panigale V4 R: तरुणाईला भूरळ घालणारी डुकाटीची पैनिगेल वी4 भारतात लाँच, आश्चर्यचकित करणारी किंमत

Ducati Panigale V4 R

Image Source : www.motorcycle.com

Ducati Launched New Bike In India: टॉप टू व्हीलर ऑटो कंपनी Ducati ने भारतात आपली पहिली Ducati Panigale V4 R लॉन्च केली आहे. ज्याची किंमत सुमारे 69 लाख 90 हजार रुपये आहे. कंपनीने डुकाटी डीलरशिपवरून या मॉडेलची बुकिंगही सुरू केली आहे. Ducati Panigale V4 R हे Panigale V4 चे अपग्रेड केलेले मॉडेल आहे. यामध्ये अत्याधुनिक डिझाइन आणि अपग्रेडेट तांत्रिक गोष्टी दिलेल्या आहे.

Ducati Company Launched Panigale V4 R: अगदी सिनेमा मध्ये दाखविल्या जाते अशी आणि तरुणाईला भूरळ घालणारी आलिशान अशी बाइक टॉप टू व्हीलर ऑटो कंपनी Ducati ने भारतात लाँच केली आहे.  Ducati Panigale V4 R असे लाँच करण्यात आलेल्या बाइकचे नाव आहे. या बाइकची किंमत सुमारे 69 लाख 90 हजार रुपये आहे. कंपनीने डुकाटी डीलरशिपवरून या मॉडेलची बुकिंगही सुरू केली आहे. Ducati Panigale V4 R हे Panigale V4 चे अपग्रेड केलेले मॉडेल आहे. यामध्ये अत्याधुनिक डिझाइन आणि अपग्रेडेट तांत्रिक गोष्टी दिलेल्या आहे. तसेच या गाडीला 998 cc Desmosedici Stradale R इंजिन दिलेले आहे.

पॉवर इंजिन

डुकाटी पानिगेल V4 R बाइक मध्ये 998 cc Desmosedici Stradale R इंजिन देण्यात आले आहे. ज्यामध्ये सुमारे सहा गिअर्स देण्यात आले होते. हे इंजिन सुमारे 15500 rpm वर 215 bhp ची मजबूत पॉवर जनरेट करू शकते. 12000 rpm वर जास्तीत जास्त 111.3 NM टॉर्क जनरेट करते. Ducati Panigale V4 R च्या सस्पेंशन आणि ब्रेकिंग सिस्टीम अंतर्गत कंपनीने या मॉडेलमध्ये अॅडजस्टेबल सस्पेंशन दिले आहे. जे 43 मिमी Ohlins NPX 25/30 फ्रंट फोर्क्स आणि Ohlins TTX 36 मागील मोनो शॉक सस्पेंशन आहे.

वैशिष्ट्ये काय?

वाहनाच्या संपूर्ण भागासह Ducati Panigale V4 R चे एकूण वजन 172 किलो आहे. आता अशा अवजड वाहनासाठी कंपनीने उत्कृष्ट ब्रेक सिस्टीम देखील दिलेली आहे. कंपनीने या मॉडेलमध्ये Brembo मोनोब्लॉक स्टाइलमा M 4.30 कॅलिपर दिले आहेत. जे ट्विन 320 मिमी फ्रंट डिस्कसह उपस्थित आहे. त्यात कंपनीने 4 पिस्टनही दिले आहेत.

उत्तम ब्रेकिंग सिस्टम

डुकाटी कंपनीने Panigale V4 R मध्ये अनेक फीचर्स दिले आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने रायडिंग मोड, पॉवर मोड, ट्रॅक्शन कंट्रोल, राइड बाय वायर, व्हीली कंट्रोल, लॉन्च कंट्रोल, स्लाइड कंट्रोल आणि टीएफटी स्क्रीन अशा सर्व सुविधा दिलेल्या आहेत.

इटालियन सुपरबाइक निर्माता कंपनी 2023 मध्ये तब्बल 9 बाइक्स लाँच करणार होती. या बाइक्सच्या किंमती 10 लाख ते 62 लाख रुपयांपर्यंत आहेत.