Today's Gold Silver Rates: आज मंगळवार (20 डिसेंबर) ला भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. तरीही सोन्याचा भाव अजूनही 54 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे कायम आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 66 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 54,180 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीची किंमत 66444 रुपये आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 54248 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज सकाळी घसरून 54180 रुपयांवर आला आहे. तसेच शुद्धतेच्या आधारावर सोन्याचे भाव स्वस्त झाले आहेत. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सकाळी चांदीही स्वस्त झाली आहे.
आजचे सोन्या चांदीचे दर किती? (Today's Gold Silver Rates)
या अधिकृत वेबसाइटनुसार, 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. 916 शुद्धतेचे सोने आज 49629 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 40635 रुपयांवर आला आहे. आजचे सोने आणि चांदीचे दर पुढीलप्रमाणे,
| सोने /चांदी | शुद्धता | किंमत | 
| सोने | 999 | 54180 | 
| सोने | 995 | 53963 | 
| सोने | 916 | 49629 | 
| सोने | 750 | 40635 | 
| सोने | 585 | 31695 | 
| चांदी | 999 | 66444 | 
सोने चांदीच्या किमती माहित करून घेण्यासाठी….. (To know the prices of gold and silver…..)
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या प्रमाणित किमतीची माहिती उपलब्ध आहे. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत.
कालच्या तुलनेत किमतीत किती घट झाली? (How much did the price drop from yesterday?)
सोने यांनो चांदीच्या दरात कालच्या तुलनेत घट दिसून आली आहे. 999 शुद्धतेच्या दरात 68 रुपयांनी घट तर चांदीच्या दरात 445 रुपयांनी घट झाली आहे.
| सोने /चांदी | शुद्धता | कालचे दर | आजचे दर | घट | 
| सोने | 999 | 54248 | 54180 | 68 | 
| सोने | 995 | 54031 | 53963 | 68 | 
| सोने | 916 | 49691 | 49629 | 68 | 
| सोने | 750 | 40686 | 40635 | 51 | 
| सोने | 585 | 31775 | 30695 | 1080 | 
| चांदी | 999 | 66898 | 66444 | 445 | 
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            