तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. दहा ग्रॅम सोने शुक्रवारच्या तुलनेत 77 रुपयांनी स्वस्त झाले आहे. एक किलो चांदीचा दरही 375 रुपयांनी खाली आला आहे. मागील आठवड्यात सुरवातीचे तीन दिवस घसरण पाहायला मिळाली होती, आणि गुरुवारी अचानक सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती, आणि आज पुन्हा घसरण झाली आहे. सोन्या चांदीच्या सर्व किमती जाणून घेऊया.
आजचे सोने चांदीचे दर (Gold and Silver Rate Today)
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज आनंदाची बातमी आहे. आज सोनं-आणि चांदीचे दर कमी झाले आहेत. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,673 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 48,289 झाले आहेत. आज चांदीच्या किंमतीही कमी झाल्याचे दिसून आहे. आज 1 किलो चांदी 61,455 रुपये झाली आहे. सोने चांदीचे अपडेट दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
10 ग्रॅम सोन्याचा दर आणि एक किलो चांदीचा भाव
सोने | शुद्धता | दर |
सोने | 999 | 52673 |
सोने | 995 | 52462 |
सोने | 916 | 48289 |
सोने | 750 | 39505 |
सोने | 585 | 30814 |
चांदी (1 किलो) | 999 | 61445 |
अशा प्रकारे जाणून घ्या सोन्याची शुद्धता Purity Of Gold
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक ॲप बनवले आहे. बीआयएस केअर ॲपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या ॲपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. या ॲपवर जाण्यासाठी इथे क्लिक करा.
जागतिक बाजारात सोने चांदीच्या किमती Gold and silver prices in the global market
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव आजही कमी आहेत. सोने 4.05 डॉलरनी घसरून $1,749.95 प्रति औंस दरावर आहे. चांदी 0.99 टक्क्यांच्या घसरणीसह 21.218 डॉलर प्रति ounce आहे. किमती स्वस्त झाल्यानंतर आज सोने-चांदी खरेदी करणे सोपे होणार आहे. आज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा मिळाला.