देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष गुंतवणुकीची योजना सुरू केली आहे. SBI WeCare FD योजनेत ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक आर्थिक लाभ देण्यात आले आहेत. या एफडीमध्ये तुमचे पैसे दुप्पट होऊ शकतात. यासाठी बँकेकडून विविध व्याज दर ऑफर करण्यात आले आहेत. आज आपण या योजनेचे काय फायदे आहेत मुदतीचा कालावधी किती आहे याबाबतची माहिती जाणून घेऊया.
SBI WeCare FD योजनेसाठी मुदत वाढ
एसबीआय बँकेने कोविड महामारीच्या काळात ज्येष्ठांसाठी वुई केअर डिपॉझिट ही विशेष योजना सुरू केली होती. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा निधी सुरक्षित ठेवण्यासोबतच त्यावर उच्च परतावा देखील मिळावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. मात्र बँकेने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी या विशेष SBIWeCare एफडी योजनेचा कालावधी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवला आहे. ही योजना नवीन ठेवींवर आणि मुदतपूर्ती ठेवींच्या नूतनीकरणावर उपलब्ध आहे. SBIWeCare या एफडीवर 7.50 टक्के व्याजदर देते.
WeCare FD चे फायदे जाणून घेऊया-
SBI च्या संकेतस्थळावरील माहिती नुसार एसबीआय हे सर्वसामान्य एफडीच्या व्याज दरापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 0.50 टक्के अधिक व्याज देते.WeCare FD योजनेमध्ये, 5 वर्षे ते 10 वर्षांच्या मुदत ठेवीवर (FD) 7.50 टक्के व्याजदर उपलब्ध आहे. तुम्ही या योजनेअंतर्गत नेट बँकिंग, किंवा शाखेत जाऊन एफडी बुक करू शकता. ज्यावर मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर TDS कापल्यानंतर व्याज मिळते. रेग्युलर फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज दर 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.50% ते 7.50% च्या दरम्यान आहे.
दहा वर्षात दुप्पट-
एसबीआयच्या वुई केअर या एफडी (we care FD) योजनेत गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे 10 वर्षात दुप्पट होतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही 10 वर्षांच्या कालावधीसाठी FD म्हणून 5 लाख रुपये गुंतवले तर या 10 वर्षांत बँक तुम्हाला 6.5 टक्के व्याजदराने सुमारे 5 लाख रुपये व्याज देते. त्यामुळे तुमचे पैसे दुप्पट होतात.