Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Writing on Bank Note: नोटांवर लिहिल्याने ती अवैध ठरते का? व्हायरल मेसेजला सरकारचे उत्तर!

Writing on Bank Note

Writing on Bank Note: नोटांवर खुणा किंवा चित्रे काढल्यास त्या नोटा चलनातून बाद केल्या जातील, असा मॅसेज व्हॉट्सअॅप आणि सोशल मिडियामधून फिरत आहे. यावर सरकारने स्पष्टीकरण दिले असून या नोटा बाद होणार की चलनात राहणार याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिले.

Writing on Bank Note: बॅंकेकडून चलनात येणाऱ्या नोटांवर लिहिण्याची तुम्हाला सवय आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण नोटांवर नाव लिहिणे, आकडे टाकणे किंवा त्यावर चित्र रेखाटण्याची बऱ्याच जणांना सवय असते. पण अशाप्रकारे नोटांवर खुणा किंवा चित्रे काढल्यास त्या नोटा चलनातून बाद केल्या जातील, असा मॅसेज व्हॉट्सअॅप आणि सोशल मिडियामधून फिरत आहे. यावर सरकारने स्पष्टीकरण दिले असून या नोटा बाद होणार की चलनात राहणार याबाबत सरकारने स्पष्टीकरण दिले.

आपल्या वापरल्या जाणाऱ्या 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर लिहिलेले असेल तर त्या घेण्यास दुकानदार किंवा व्यापारी नकार देतात. त्याचप्रमाणे ग्राहकही अशा नोटा दुकानदारांकडून घेत नाहीत. कारण सध्या सोशल मिडियावर एक मॅसेज फिरतोय. या मॅसेजमध्ये लिहिलेल्या नोटा सरकार अवैध करणार, असे सांगितले जात आहे. या मॅसेजमध्ये रिझर्व्ह बँकेच्या चलनी नोटांवरील नवीन मार्गदर्शक सूचनांचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यात असे म्हटले आहे की, नोटांवर लिहिणे प्रतिबंधित आहे. नवीन नोटांवर काहीही लिहिल्याने नोट अवैध ठरते आणि ते कायदेशीर चलन राहणार नाही.

याबाबत केंद्र सरकारने रविवारी (दि.8 जानेवारी) स्पष्ट केले आहे की, बँकेच्या नोटेवर लिहिण्याचा अर्थ असा नाही की, ती आता कायदेशीर नाही. सरकारने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नवीन गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आहेत. त्या गाईडलाईननुसार, नोटांवर लिहिणे अवैध आहे. 

“बँकेच्या नोटेवर लिहिल्याने ती अवैध ठरते का? नाही, स्क्रिबलिंग असलेल्या नोटा अवैध नाहीत आणि त्या कायदेशीर आहेत. चलनी नोटांच्या पॉलिसी अंतर्गत, लोकांना विनंती केली जाते की नोटांवर लिहू नका. कारण यामुळे त्या खराब होतात आणि जास्त काळ टिकत नाहीत,”, असे पीआयबीच्या (Press Infromation Bureu-PIB) ट्विटर हॅण्डलवर म्हटले आहे.

आरबीआयने नोटांबाबत काय म्हटले?

रिझर्व्ह बॅंकेने 1999 मध्ये प्रसिद्ध केलेल्या धोरणात म्हटले आहे की, नागरिकांनी नोटांवर लिहू नये. यामुळे नोटा खराब होतात आणि त्यांचा कार्यकाल कमी होतो. तसेच अशा लिहिलेल्या नोटा बँकांनी नागरिकांना बदलून द्याव्यात. नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या दर्जाच्या नोटा आणि नाणी देण्याचे उद्दिष्ट आरबीआयचे आहे.