PPF Return Calculator: पोस्टातील पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही अशी एक योजना आहे; जी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देते. याचा मॅच्युरिटी कालावधी हा तब्बल 15 वर्षांचा आहे आणि या स्कीममध्ये एका वर्षात जास्तीत 1.50 लाख रुपये गुंतवता येतात. पण यामध्ये गुतंवलेली रक्कम किमान दुप्पट तरी होते का? हे आपण पाहणार आहोत.
PPF मध्ये एका वर्षात ज्याप्रमाणे जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करता येतात. त्याप्रमाणे यात किमान 500 रुपयांची गुंतवणूक करावी लागते. या योजनेमध्ये म्युच्युअल फंडमधील एसआयपी प्रमाणे प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करण्याची सुविधा आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर एक चांगला निधी उभा करण्यासाठी या योजनेला अधिक पसंती दिली जात असल्याचे दिसून येते.
Table of contents [Show]
मागील 20 वर्षात व्याजदरात 5 टक्क्यांची कपात
मागील 20 ते 22 वर्षांचा विचार करता पीपीएफ मिळणाऱ्या व्याजदरात जवळपास 5 टक्क्यांनी कपात झाली आहे. यावर मिळणारे व्याजदर हे पूर्वीसारखे आकर्षक राहिलेले नाहीत. तरीही यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. यामध्ये सिस्टेमॅटिक पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाल्याचे दिसून येते. त्यात आरबीआय बँकेकडून रेपो दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे येणाऱ्या काळात या योजनेवरील व्याजदरातदेखील मोठी वाढ होऊ शकते.
PPF Calculator
सध्याचा व्याजदर 7.10 टक्के
जानेवारी 2000 या वर्षात या योजनेवर 12 व्याजदर मिळते होते. ते 2011 मध्ये 8 टक्क्यांवर आले. त्यानंतर 2015 मध्ये 8.70 टक्के तर 2020 मध्ये 7.90 टक्के व्याज दिले जात होते. 1 एप्रिल, 2020 पासून ते आतापर्यंत पीपीएफवर फक्त 7.10 टक्के व्याज मिळत आहे.
पीपीएफमधून 15 वर्षात गुंतवणूक दुप्पट
जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 12,500 रुपये पीपीएफमध्ये गुंतवत आहात आणि त्यावर वर्षाला 7.1 टक्के व्याज मिळत आहे; तेही चक्रवाढ पद्धतीने. तर तुम्ही 15 वर्षात पीपीएफमध्ये एकूण 22,50,000 रुपयांची गुंतवणूक करता. 15 वर्षात तुम्हाला या गुंतवणुकीवर अंदाजे 18,18,209 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच तुमची 22,50,000 रुपयांची गुंतवणूक 15 वर्षात 40,68,209 रुपये म्हणजे दुप्पट होते.
पीपीएफ योजनेवर मिळणारे फायदे
- पीपीएफवर वर्षाला 7.1 टक्के व्याज मिळते. जे बँकेतील फिक्स डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त आहे.
- दीर्घकाळासाठी ही योजना सुरू असल्यामुळे यावर चक्रवाढ पद्धतीचा फायदा मिळतो.
- पीपीएफमध्ये जमा होणाऱ्या रकमेवर सेक्शन 80C अंतर्गत कर सवलत मिळते.
- पीपीएफमध्ये वर्षाला किमान 500 रुपयांपासून 1.50 लाखापर्यंत गुंतवणूक करता येते.
- पीपीएफमध्ये एसआयपीप्रमाणे प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करण्याच सुविधा उपलब्ध आहे.
- पीपीएफवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारी एकूण रक्कम ही टॅक्स-फ्री आहे.
- पीपीएफ खाते ओपन केल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यावर जमा झालेल्या रकमेवर कर्ज मिळू शकते.