तुम्ही म्हणाल की, कपड्यांच्या ब्रॅण्डचं काय एवढं. कपडे हे कपडे असतात; आणि कुठल्याही कपड्याने माणसाचं अंग झाकलं जातं. मग ब्रॅण्डेड कपड्यांची गरजच काय? पण मित्रांनो, तुम्ही म्हणता ते खरं आहे. पण अगदी तसंही नाहीये. म्हणजेच ब्रॅण्डेड कपड्यांची गरजच नाही. असं थेट म्हणता येणार नाही. नक्कीच ब्रॅण्डेड कपड्यांची बातच वेगळी असते. तर आज आपण जगातील सर्वांत महागडा ब्रॅण्ड कोणता? ते जाणून घेणार आहोत. जसे जगभरात महागडे ब्रॅण्ड ढिगाने आहेत. त्यातून काही निवडक ब्रॅण्ड काढणं अवघड आहे. त्यामुळे आपण कपड्यातला सर्वांत महागडा ब्रॅण्ड कोणता ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
सर्वप्रथम आपण ब्रॅण्ड म्हणजे काय? हे थोडक्यात समजून घेऊ. तर ब्रॅण्ड हा शब्द व्यवसाय आणि व्यवसायातील मार्केटिंगशी संबंधित असून, यामुळे एका विशिष्ट कंपनीची विशिष्ट वस्तू आणि तिचा दर्जाची ओळख करून देणारी टर्म आहे. आज मार्केटमध्ये अनेक वस्तुंचे वेगवेगळे ब्रॅण्ड आहेत. ते त्या वस्तुंचं वेगळंपण आणि दर्जा अधोरेखित करतात. उदाहरणार्थ, Apple कंपनीचा iPhone हा इतर कंपन्यांसारखा एक फोनच आहे. पण त्याची ओळख आयफोन अशीच आहे आणि तो इतर कंपन्यांच्या तुलनेत महागडा फोन आहे.
मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान घातलेल्या टी-शर्टवरून सोशल मिडियामध्ये नुसती उठाठेव चालली होती. या उठाठेवीत आपल्या कामाचा एकच मुद्दा होता की, ब्रॅण्डेड कपड्यांची किंमत किती असू शकते. तर राहुल गांधी यांनी घातलेल्या बरबेरी ब्रॅण्डच्या (Burberry) टी-शर्टची किंमत 40 हजार रुपये असल्याचे सांगितले गेले आणि हा ब्रॅण्ड 2022च्या यादीमध्ये 16 व्या क्रमांकावर आहे. हा ब्रॅण्ड इंग्लंडमधील आहे. मागील वर्षी तो या यादीत 21व्या क्रमांकावर होता. तर यावरून पहिल्या टॉप 10 कपड्यांच्या ब्रॅण्डची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. पण तुर्तास आज आपण फक्त 2022 मधील कपड्यांचे टॉप 10 नामांकित ब्रॅण्ड कोणते आहेत; याची माहिती घेणार आहोत.
जगातील टॉप 10 कपड्यांचे ब्रॅण्ड | ||||
---|---|---|---|---|
2022नुसार क्रम | Logo | ब्रॅण्ड | देश | ब्रॅण्डचा टर्नओव्हर |
1 | अमेरिका | $33,176M | ||
2 | फ्रान्स | $23,426M | ||
3 | इटली | $18,110M | ||
4 | फ्रान्स | $15,260M | ||
5 | जर्मनी | $14,636M | ||
6 | फ्रान्स | $13,499M | ||
7 | स्पेन | $12,997M | ||
8 | स्वीडन | $12,704M | ||
9 | फ्रान्स | $12,419M | ||
10 | जपान | $9,640M |
Source:https://brandirectory.com
अमेरिकेतील नायके हा ब्रॅण्ड जगातील टॉप मोस्ट ब्रॅण्ड म्हणून गणला जातो. त्यानंतर दुसरा फ्रान्सचा लुईस वुईटॉन आणि तिसा इटलीचा गुची ब्रॅण्डचा क्रमांक लागतो. टॉप 10 ब्रॅण्डमध्ये फ्रान्स देशाचे 4 ब्रॅण्ड आहेत. या चार ब्रॅण्डमध्ये लुईस वुईटॉन, चॅनेल, हर्मेस आणि कार्टर यांचा समावेश आहे.