Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पोस्टाची ही योजना माहितीये का तुम्हाला? 5 लाखाच्या गुंतवणुकीवर 2.24 लाख रुपये व्याज ते ही 5 वर्षात

Post Office Time Deposit Scheme

Image Source : www.rightsofemployees.com

Post Office Investment Scheme: पोस्टाच्या या योजनेत तुम्ही किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तर किमान गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. जाणून घ्या या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती.

Post Office Investment Scheme: तुम्हाला 5 वर्षांसाठी एखाद्या स्कीममध्ये पैसे गुंतवायचे आहेत का? या स्कीममध्ये जोखीमसुद्धा नाही आणि त्यातून तुम्हाला चांगला परतावा देखील मिळू शकतो. हे इतक्या ठामपणे सांगण्याचे कारण म्हणजे, ही स्कीम सरकारची असून पोस्टातर्फे ती राबवली जाते.

पोस्टाच्या स्मॉल सेव्हिंग योजना या गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहेत. यामधील गुंतवणूक जोखीम फ्री आणि निश्चित परतावा मिळवून देणारी असते. त्यापैकीच टाईम डिपॉझिट ही एक गुंतवणूक योजना आहे. या योजनेमध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी एकत्रितरीत्या गुंतवणूक करता येते. यामध्ये गुंतवलेल्या रकमेवर प्रत्येक वर्षाला सरकारकडून व्याज मिळते.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना आणि व्याजदर

पोस्टाच्या टाईम डिपॉझिट स्कीमध्ये 1 वर्षाच्या गुंतवणुकीवर 6.90 टक्के आणि 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7 टक्के व्याज दिले जात आहे. तर 3 आणि 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर अनुक्रमे 7 आणि 7.5 टक्के व्याज दिले जात आहे. या व्याजदरांचा दर 3 महिन्यांनी सरकारतर्फे आढावा घेतला जातो. टाईम डिपॉझिटवर सध्या देत असलेला व्याजदर हा 1 जुलैपासून लागू झाला असून तो 30 सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे.

5 लाखाच्या गुंतवणुकीवर 5 वर्षात 2.24 लाख रुपये व्याज

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट कॅल्क्युलेटरनुसार, तुम्ही 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये या योजनेमध्ये गुंतवले, तर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 7,24,974 रुपये मिळतील. त्यातील 2,24,974 रुपये हे निव्वळ तुमचे व्याज असणार आहे. या व्याजदराचा सरकार दर 3 महिन्यांनी आढावा घेते आणि त्यानुसार त्यात बदल करते. याचा निश्चितच फायदा गुंतवणूकदारांना मिळतो. मुदत ठेवींमधील व्याजदर फिक्सड् असतो. त्यात बदल होत नाहीत. टाईम डिपॉझिट योजनेवरील  नवीन व्याजदर ऑक्टोबरपासून लागू होतील.

5 वर्षांच्या डिपॉझिटवर कर सवलतीचा लाभ

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेच्या 5 वर्षांच्या स्कीमवर गुंतवणूकदारांना टॅक्समध्ये सवलत मिळते. इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80C अंतर्गत 1.50 लाखाच्या गुंतवणुकीवर क्लेम करता येतो.पण यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे या योजनेची मॅच्युरिटी झाल्यावर मिळणार रकमेवर टॅक्स लागू होतो.

18 वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीममध्ये वैयक्तिक किंवा संयुक्त खाते (Individual or Joint Account) सुरू करू शकते. संयुक्त खात्यामध्ये जास्तीत जास्त 3 व्यक्तींचा समावेश होऊ शकतो. तसेच किमान 1000 रुपयांपासून यामध्ये गुंतवणूक करता येते.