Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mira Murati creator of ChatGPT: ChatGPT मागील हा भारतीय चेहरा तुम्हाला माहितेय का?

Mira Murati creator of ChatGPT

Image Source : www.kalingatv.com

Mira Murati creator of ChatGPT: ChatGPT नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आले होते आणि ते संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. पण चॅटजीपीटीच्या या अफलातून सेवेबाबत तज्ज्ञ सध्या चिंता व्यक्त करत आहेत.

ChatGPT हे एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Inteligence) चॅटबॉट आहे; जो युझर्सने दिलेल्या इनपुटवर आधारित मजकूर तयार करतो. ChatGPT नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आले होते आणि ते संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. पण चॅटजीपीटीच्या या अफलातून सेवेबाबत तज्ज्ञ सध्या चिंता व्यक्त करत आहेत. यात ChatGPTचे मॉडेल डेव्हलप करणाऱ्या ओपन एआय (Open AI)च्या सीटीओ मीरा मूर्ति (Mira Murati, Chief Technology Officer-CTO, Open AI) यांनीही चॅटबॉटबद्दल चिंता व्यक्त करत आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा (Artificial Intellegence) गैरवापर केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली.

आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा वाईट कामांसाठी वापर 

आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) गैरवापर केला जाऊ शकतो किंवा युझर त्याचा उपयोग वाईट कामांसाठी करू शकतात. अशावेळी जागतिक स्तरावर या नवीन  तंत्रज्ञानाच्या वापरावर नियंत्रण कसे ठेवायचे, हा प्रश्न आहे. तंत्रज्ञानाचा किंवा आर्टीफीशिअल इंटेलिजन्सचा वापर हा मानवी मूल्यांशी सुसंगत कसा होईल, यावर सारे निर्भर आहे, असे टाईम मासिकाशी बोलताना मीरा मूर्ति यांनी सांगितले.

कोण आहे मीरा मूर्ति?

मीरा मूर्ति या ओपन एआय (Open AI)च्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे त्या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांचा जन्म 1988 मध्ये अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे झाला असून त्यांचे आई-वडिल मूळचे भारतीय आहेत. मीरा यांनी डार्टमाऊथ येथील थायर स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. चॅटजीपीटीवर काम करण्यापूर्वी त्यांनी यापूर्वी वेगवेगळ्या नामांकित संस्थांसाठी काम केले.

मीरा यांनी 2011 मध्ये गोल्डमन सॅक्समध्ये समर अनालिस्ट म्हणून काम केले. त्यानंतर झोडियाक एरोस्पेसमध्ये वर्षभर कॉन्सेप्ट इंजिनिअर म्हणून काम पाहिले. मग टेस्लामध्ये सिनिअर प्रोडक्ट मॅनेजर म्हणून 2013 ते 2016 मध्ये कार्यरत होत्या. 2016 ला त्यांनी लीप मोशन कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट, प्रोडक्ट आणि इंजिनिअरिंग या पदावर काम केले आणि मग 2018 पासून ओपन एआयमध्ये काम करत आहेत.  

ChatGPT काय काय करतं?

एआय चॅटबॉट, चॅटजीपीटी नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च झाल्यापासून त्याचे विविध पैलू समोर येऊ लागले आहेत. जसे चॅटजीपीटी हे इतिहास, तत्त्वज्ञानावरील चर्चेसोबतच तुम्हाला गाणी लिहून देण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर अगदी काही मिनिटांमध्ये चॅटजीपीटी अचूक कोडदेखील लिहून देऊ शकतो. युझर्स चॅटजीपीटीचा वापर करून कोणत्याही भाषेतून लहान-मोठे कोड लिहून घेऊ शकतो. एक स्टॅटिक वेबसाईट तयार करू शकतो.

ChatGPT मध्ये जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर (GPT) तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. यामध्ये वापरण्यात आलेले ट्रान्सफॉर्मर अल्गोरिदम हे वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीतून विशेष माहिती तुमच्यासाठी शोधून काढतात. हे ट्रान्सफॉर्मर फक्त शब्द, वाक्ये, परिच्छेद एवढेच नाही तर आणखी बरेच काही तुम्हाला लिहून देऊ शकतात. यासाठी ट्रान्सफॉर्मरला मोठ्या प्रमाणात माहितीची आवश्यकता असते. त्याच्या सिस्टिमध्ये जेवढी माहिती अधिक तेवढा तुम्हाला तयार करून दिला जाणारा डेटा अचूक असू शकेल.

AI ला सर्व स्त्रोतांमधून मिळणारी माहिती आवश्यक

AI किंवा ChatGPTसाठी आवश्यक असणारी माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांमधून मिळू शकते आणि ती आवश्यक सुद्धा आहे. सध्या आमच्याकडून पुरवली जाणारी माहिती ही खूपच कमी आहे. त्यात आम्ही कमी पडत आहोत. सिस्टिमला अचूक उत्तरांसाठी जास्तीतजास्त माहितीची आवश्यकता आहे. तसेच यामध्ये नियामक, सरकार आणि इतर घटकांचीसुद्धा मदत लागणार आहे, असे मीरा यांचे म्हणणे आहे.