Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is ChatGPT: चॅट जीपीटी म्हणजे काय? चॅट जीपीटी गुगलला पर्याय ठरतोय का?

What is ChatGPT

What is ChatGPT: चॅट जीपीटी हे एक चॅट बॉट असून ओपन आर्टीफिशिअल इंटेलिजेन्सने (Open Artificial Intelligence)ने तयार केलेले आहे. हा चॅट बॉट युझर्सने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तपशीलासह तयार करून देतो. तसेच हे गुगलपेक्षा दोन पाऊल पुढे असून तो आपल्याला हवी तशी माहिती विविध स्त्रोतांमधून उपलब्ध करून देतो.

चॅट जीपीटी हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चॅटबॉट (ChatGPT is Artificial Intelligence Chat Bot) आहे. या चॅटबॉक्सला विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे अवघ्या काही सेकंदात मिळतात. थोडक्यात गुगलला टक्कर देणारे हे नवीन तंत्रज्ञान आहे. कारण सध्या जगभरात गुगलचा सर्च इंजिन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे कोणतीही माहिती किंवा कशाचाही शोध घ्यायचा असेल तर गुगलचाच वापर केला जातो. पण आता मायक्रोसॉफ्ट आणलेल्या चॅट जीपीटीचाही सर्च इंजिन म्हणून वापर करता येणार आहे. चॅट जीपीटी हे गुगलपेक्षा दोन पाऊल पुढे असून तो आपल्याला हवी तशी माहिती उपलब्ध स्त्रोतांमधून उपलब्ध करून देतो.

चॅट जीपीटी काय आहे?

चॅट जीपीटी या फूलफॉर्म चॅट जनरेटीव्ह प्री-ट्रेंड ट्रान्सफॉर्मर (Chat Generative Pre-Trend Transformer-ChatGPT) असा आहे. चॅट जीपीटी हे एक चॅट बॉट असून ओपन आर्टीफिशिअल इंटेलिजेन्सने (Open Artificial Intelligence)ने तयार केलेले आहे. हा चॅट बॉट युझर्सने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तपशीलासह तयार करून देतो. जसे की तुम्ही चॅट जीपीटीकडून निबंध, व्हिडिओसाठीची स्क्रीप्ट, कार्यक्रमाची, निमंत्रणाची पत्रे किंवा तुम्हाला हवे तसे एखादे पुस्तकही लिहून घेऊ शकता.

चॅट जीपीटी कधी लॉन्च झाले?

चॅट जीपीटी 30 नोव्हेंबर, 2022 रोजी लॉन्च करण्यात आले होते. ओपन आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (Open Artificial Intellegence) कंपनीने याची निर्मिती केली असून, यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीने चॅट जीपीटी लॉन्च केले आहे. सध्या जगभरात 15 दशलक्षाहून अधिक लोक चॅट जीपीटीचा वापर करत आहेत.


चॅट जीपीटीचा इतिहास काय?

चॅट जीपीटी हा सध्या सर्वांच्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे. कारण यामुळे गुगलसारख्या सर्च इंजिनवर तर परिणाम होणारच आहे. पण त्याचबरोबर चॅट जीपीटी ज्या ज्या गोष्टींवर सराईतपणे काम करत आहे. त्या मूळ व्यवसायावरही याचा विपरित परिणाम होणार आहे. तर या चॅट जीपीटीची सुरूवात 2015 मध्ये इलॉन मस्क याच्या मदतीने सॅम ऑल्टमन याने केली होती.पण इलॉन मस्क 1-2 वर्षांतच या प्रोजेक्टमधून बाहेर पडला आणि त्याची जागा मायक्रोसॉफ्टने घेऊन ऑल्टमनला फंडिंग केले.

गुगल आणि चॅट जीपीटीमध्ये फरक काय?

गुगल हे एक जलद आणि अपडेट सर्च इंजिन म्हणून काम करते. जसे की, युझर्सने विचारलेल्या प्रश्नाशी संबंधित माहितीच्या लिंकस गुगल काही सेकंदात उपलब्ध करून देते. तर चॅट जीपीटी युझर्सने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आर्टीफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार करून देते. हा गुगल आणि चॅट जीपीटीमधील मोठा फरक आहे. गुगल उपलब्ध असलेल्या माहितीतून सर्व पर्याय युझर्सच्या समोर मांडतो. तर चॅट जीपीटी युझर्सला हवी असलेली माहिती एआयच्या मदतीने तयार करून देतो.

चॅट जीपीटीमुळे गुगलवर परिणाम होऊ शकतो?

चॅट जीपीटीमध्ये वापरण्याता आलेल्या आर्टीफिशिअल इंटेलिजन्स वापर करून हे तंत्रज्ञान युझर्सला हवी ती माहिती त्याच्या गरजेप्रमाणे तयार करून देतो. जे गुगल सध्या देत नाही. गुगल युझर्सने विचारलेल्या प्रश्नाशी संबंधित त्याच्याकडे उपलब्ध असलेली माहिती समोर आणून देतो. त्यातून युझर्स त्याला हवी ती माहिती निवडतो. हाच या दोघांमधील मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. त्यामुळे चॅट जीपीटीचा गुगलवर नक्की परिणाम होऊ शकतो.

चॅट जीपीटीची वैशिष्ट्ये काय आहेत?

  • चॅट जीपीटी त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात देतो. 
  • चॅट जीपीटीचा वापर युझर्सला हवा तसा मजकूर तयार करण्यासाठी करता येतो.
  • चॅट जीपीटीवर प्रश्नांची नेमकी उत्तरे मिळतात. गुगलप्रमाणे फक्त लिंक दिली जात नाही.
  • चॅट जीपीटीच्या मदतीने निबंध, लेख, अर्ज, गोष्टी, पुस्तके, कॉम्प्युटर प्रोगॅम असे सर्व लिहिता येते.

चॅट जीपीटीचे फायदे

  • चॅट जीपीटीचा गुगलला पर्याय म्हणून वापर होऊ शकतो. कारण हे गुगलप्रमाणे फक्त लिंक देत नाही, तर  थेट प्रश्नाचे उत्तर देते. 
  • युझर्सने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आवडले नाही तर, त्याचा रिप्लाय देता येतो. हा रिप्लाय चॅट बॉट अपडेट करून त्यात सुधारणा करतो.
  • सध्या चॅट जीपीटी सेवा विनामूल्य उपलब्ध आह. यासाठी काहीच शुल्क सध्या आकारले जात नाही.

चॅट जीपीटीचे तोटे

  • सध्या चॅट जीपीटी फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. येणाऱ्या काळात यात स्थानिक भाषांचा समावेश होण्याची शक्यता आहे. 
  • चॅट जीपीटीवर 2022 नंतरची माहिती उपलब्ध नाही. यामध्ये 2022 पर्यंतचीच माहिती टाकण्यात आली आहे. 
  • चॅट जीपीटी सध्या रिअल टाईम अपडेट नाही, असे म्हणता येईल.
  • चॅट जीपीटी सध्या मोफत उपलब्ध आहे. पण ते गुगलप्रमाणे पूर्णत: मोफत सेवा देण्याची शक्यता कमी आहे. यासाठी शुल्क द्यावे लागेल.

FAQ on ChatGPT

ChatGPT हे काय आहे?

चॅट जीपीटी (Chat GPT) हे आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा मदत घेऊन तयार केलेले चॅट बॉट आहे.

चॅटबॉट (ChatBoat) म्हणजे काय?

चॅटबॉट हे आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून तयार केलेले सॉफ्टवेअर आहे. जे तुमच्याशी संवाद साधते. 

ChatGPT चा फूलफॉर्म काय आहे?

चॅट जीपीटी म्हणजे चॅट जेनेरेटीव्ह प्री-ट्रेन ट्रान्सफॉर्मर (Chat Generative Pre-Trained Transformer)

ChatGPT ची सुरूवात कोणी आणि कधी केली?

ChatGPT ची सॅम ऑल्टमन हे 2015 पासून काम करत होते.

ChatGPT कधीपासून सुरू झाले?

ChatGPT 30 नोव्हेंबर, 2022 रोजी लॉन्च झाले.