Types of US Visa: United States of America म्हणज अमेरिका देशात जाण्यासाठी प्रत्येक परदेशी नागरिकाला व्हिसाची आवश्यकता असते. कारण कोणतंही असो. तिथे तुम्हाला शिक्षणासाठी जायचं आहे. नातेवाईकांकडे काही दिवस फिरण्यासाठी जायचे आहे किंवा तिथल्या 2 दिवसांच्या कार्यक्रमाला तुम्हाला हजेरी लावायची आहे.त्यासाठी तुमच्याजवळ व्हिसा असणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्ही अमेरिका वारी करू शकत नाही.
अमेरिकेत जाण्यासाठी कमी कालावधीसाठी नॉन-इमिग्रंट व्हिसा (Non-Immigrant Visa) आणि दीर्घ कालावधीसाठी इमिग्रंट व्हिसा (Immigrant Visa) दिला जातो. भारतीयांना अमेरिकेत जाण्यासाठी नॉन-इमिग्रंट व्हिसाची गरज भासते. नॉन-इमिग्रंट व्हिसाच्या मदतीने एक विशिष्ट कारणाचा दाखला देऊन अमेरिकेत जाता येते. जसे की, शिक्षणासाठी, व्यावसायिक पर्यटक म्हणून, स्पेशल स्किल असलेला उमेदवार म्हणून किंवा पर्यटक म्हणून जाता येते.
अमेरिकेच्या दूतावासाकडून (American Consulate) वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास 35 प्रकारचे व्हिसा दिले जातात. यातील आपण काही मोजक्या व्हिसांबद्दल जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
अमेरिकेतील व्हिसाचे विविध प्रकार (Different Types of US Visas)
टुरिस्ट किंवा बिझनेस व्हिसा (Tourist or business Visa)
टुरिस्ट किंवा बिझनेस व्हिसा अंतर्गत बी-1 आणि बी-2 असे दोन प्रकारचे व्हिसा दिले जातात. बरेच जण हे दोन्ही प्रकार एकत्र करून एकच व्हिसा मिळवतात. तुम्हाला ही व्हिसा घेताना अमेरिकन दुतावसातील अधिकाऱ्यांना खात्री पटवून द्यावी लागते की, तुम्ही अमेरिकेत काही दिवसांसाठीच थांबणार आहात. त्याचबरोबर तिथे राहत असताना तु्मच्याजवळ खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे आहेत का? तसेच तु्म्ही राहणार कुठे? याची सर्व माहिती संबंधित अधिकाऱ्यांना द्यावा लागते. या व्हिसा अंतर्गत तुम्ही तिथली नोकरी स्वीकारू शकत नाही.
बी-1 व्हिसा हा व्यावसायिक कामाशी संबंधित असतो. जसे की, तु्म्ही तिथली एखादी सायन्टेफिक किंवा एज्युकेशनल मिटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी जात आहात किंवा एका व्यावसायिक डीलसाठी किंवा एखादा करार करण्यासाठी जात आहात.
बी-2 व्हिसा हा मेडिकल उपचारासाठी दिला जातो. याध्ये तुम्ही तुमचे पर्यटन करू शकता. मित्रांना, नातेवाईकांना भेटू शकता. तिथे मेडिकल ट्रीटमेंट घेऊ शकता. तसेच सोशल किंवा विविध अॅक्टीव्हिटीजमध्ये सहभागी होऊ शकता.
कामासाठीचा व्हिसा (Work Visa)
Work Visa म्हणजे तुम्हाला एका विशिष्ट कालावधीतील कामासाठी तिथे जात असाल तर तुमच्याजवळ वर्क व्हिसा असणे आवश्यक आहे. वर्क व्हिसाचे उपप्रकार बरेच आहेत. यामध्ये H1 पासून H4, तसेच L1, L2, o, P आणि Q टाईप व्हिसा दिला जातो. प्रत्येकाचे नियम आणि कारणे थोड्याफार प्रमाणात वेगवेगळी आहेत.
स्टुडंट व्हिसा Student Visa)
अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टुडंट व्हिसा दिला जातो. यासाठी सदर विद्यार्थ्याने तिथल्या विद्यापीठात रीतसर अॅडमिशन घेणे गरजेचे आहे. तिथल्या विद्यापीठाने प्रवेश दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे स्टुडंट व्हिसा दिला जातो. स्टुडंट व्हिसाचे दोन प्रकार असतात. त्यातील F-1 व्हिसा हा अमेरिकेत शॉर्ट टर्म कोर्ससाठी अॅडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिला जातो. तसेच तिथल्या पब्लिक सेकंडरी स्कूलमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना F-1 Visa दिला जातो. तर नॉन-अॅकेडेमिक, व्होकेशनल ट्रेनिंगचे शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना M-1 Visa दिला जातो.
एक्सचेंज व्हिजिटर व्हिसा (Exchange Visitor Visa)
विविध प्रकारच्या आदान-प्रदान कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना Exchange Visitor Visa दिला जातो. या प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला तिथल्या संस्थेकडून/विद्यापीठाकडून आमंत्रण येणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा व्हिसा साधारण शिक्षक, विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, व्यावसायिक ट्रेनर्स आणि कन्सलटंट यांना दिला जातो.
शिप क्रू किंवा ट्रान्सिट व्हिसा (Ship Crew or Transit Visa)
अशा प्रकारच्या व्हिसामध्येही दोन प्रकार आहेत. यातील ट्रान्सिट सी व्हिसा (Transit C Visa) हा जो प्रकार आहे. त्यामध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्या देशामध्ये जाणार आहे. पण ती व्यक्ती अमेरिकेतून त्या देशात जाणार असेल, तर त्या व्यक्तीला Transit C Visa दिला जातो. तर Crew D Visa हा प्रकार समुद्रामार्गे जहाज किंवा विमानाची सेवा देणाऱ्यांना दिला जातो.
अशाच प्रकारे धार्मिक कामासाठी, घरगुती कर्मचारी म्हणून काम करण्यासाठी, मिडिया आणि पत्रकारितेच्या कामासाठी व्हिसा दिला जातो. B-2 व्हिसा अंतर्गत त्या व्यक्तीला त्याचा जोडीदार आणि 21 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना अमेरिकेत नेण्याची परवानगी असते.