चहाचं उत्पादन भारतात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. आपल्या देशात चहाची किंमतही सर्वांना परवडण्यासारखी आहे. कमी किंमतीत सहज चहा उपलब्ध होतो. सरासरी एक किलो चहाची किंमत 500 रुपयांपर्यंत आहे. आता असा चहा असला तरी जगात काही ठिकाणी मिळणाऱ्या चहाची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. करोडो रुपये किंमत असलेल्या या चहामध्ये असं आहे तरी काय, असा सवाल तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. जगातला हाच सर्वात महाग चहा मिळतो तो चीनमध्ये...
Table of contents [Show]
कुठे होते शेती?
चीनमधल्या या चहाची किंमत तर मिलियनमध्ये आहे. चीनमधल्या फुजियान प्रांतातल्या वुई पर्वतांमध्ये या चहाची शेती आढळते. या चहाची शेवटची कापणी 2005मध्ये झाली होती. दा हाँग पाओ असं या चहाचं नाव आहे. त्याच्या काही ग्रॅमची किंमत सोन्याच्या किंमतीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त होती. 2002मध्ये या मौल्यवान अशा केवळ 20 ग्रॅम चहाची किंमत 180,000 युआन किंवा सुमारे 28,000 डॉलर इतकी प्रचंड होती.
राष्ट्रीय खजिना
या चहा अत्यंत दुर्मीळ मानला जातो. त्यामुळे याला राष्ट्रीय खजिनाही घोषित करण्यात आलं आहे. याला जीवन देणारा चहा असंही म्हटलं जातं. हा चहा इतका विशेष आहे, की चेअरमन माओ यांनी 1972मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना त्यांच्या चीनच्या अधिकृत भेटीवर 200 ग्रॅम चहा भेट दिला होता. 1849मध्ये ब्रिटीश वनस्पतिशास्त्रज्ञ रॉबर्ट फॉर्च्यून एका गुप्त मोहिमेंतर्गत माउंट वुई याठिकाणी गेले होते. तिथून त्यांनी हा चहा भारतात आणला होता.
बाजारात उपलब्ध नाही
जगातला सर्वात महागडा चहा असलेला दा हाँग पाओ हा बाजारात उपलब्ध नाही. तो फक्त लिलावाद्वारे मिळतो. ही एक अत्यंत दुर्मीळ वस्तू आहे, बाजारातून ती विकत घेता येत नाही. हा चहा एका दशकापूर्वी चीनच्या सिचुआनच्या याआन पर्वतांमध्ये एका उद्योजक आणि पांडा उत्साही व्यक्तीनं पहिल्यांदा पिकवला होता. 50 ग्रॅमची पहिली बॅच 3,500 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयात 2.90 लाखांमध्ये विकली गेली. यामुळेच तो सर्वात महाग चहा बनला.
इतिहास काय?
दा हाँग पाओ चहाच्या इतिहासावरही एक नजर टाकू. या चहाची लागवड चीनच्या मिंग राजवंशाच्या काळात सुरू झाली. चिनी लोकांचा असा विश्वास आहे, की त्यावेळी मिंग राजवटीची राणी अचानक आजारी पडली होती. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हा चहा पिण्याचा सल्ला देण्यात आला. हा चहा प्यायल्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली. यानंतर राजाने ते संपूर्ण राज्यात वाढवण्याचा आदेश दिला होता. राजाच्या लांब झग्यावरून या चहाच्या पानाला दा हॉंग पाओ असं नाव पडलं.