Pink Tax: नागरिकांकडून सरकार वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स(Tax) घेत असते. ज्यामध्ये आयकर(Income tax), कॉर्पोरेट टॅक्स(Corporate Tax) आणि जीएसटीबद्दल(GST) सगळ्यांना माहिती आहे. पण पिंक टॅक्सबद्दल(Pink Tax) तुम्हाला माहित आहे का? हा कोणत्याही सरकारकडून लावलेला कर नाही तर नक्की काय आहे चला तर जाणून घेऊयात.
पिंक टॅक्स म्हणजे नक्की काय?
कोणतीही कंपनी जेव्हा महिलांसाठी कोणताही प्रोडक्ट(Product) करते त्यावर जास्त पैसे आकारले जातात. अनेकदा भारतातील महिलांना उत्पादनांच्या किमतीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागते आणि याची त्यांना कल्पनाही नसते. या टॅक्सच्या माध्यमातून पुरुषांच्या तुलनेत महिलांना (Women) यामध्ये जास्तीचे पैसे मोजावे लागतात. महिलांकडून कंपन्या जास्त पैसे कर म्हणून कापून घेत आहेत आणि याचा सर्वाधिक फटका थेट महिलांना बसत आहे. पिंक टॅक्सच्या माध्यमातून सरासरी प्रोडक्ट्सच्या किमतीवर महिलांकडून 7 टक्के जास्त पैसे घेतले जातात. तर पर्सनल केअर प्रोडक्ट्सवर हा फरक 13 टक्क्यांपर्यंत वाढला जातो.
कोणत्या प्रोडक्ट अंतर्गत हा टॅक्स कापला जातो?
बाजारपेठेत असे अनेक प्रोडक्ट्स आहे जिथे महिला नकळत पुरुषांच्या तुलनेत जास्त पैसे देतात. पुरुषाच्या तुलनेत सलूनमध्ये महिलांकडून जास्तीचे पैसे घेतले जातात. हीच गोष्ट अनेक ठिकाणी होते जसे की बॉडी वॉश(Body Wash), साबण(Soap), क्रीम(Cream) यासारखे महिलांचे पर्सनल केअर प्रोडक्ट्स(Women's personal care products) पुरुषांच्या प्रोडक्टपेक्षा जास्त महाग असतात. यामागील कारण असे मानले जाते की स्त्रिया किमतीच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असतात. त्यांना उत्पादने आणि त्याची किंमत आवडली तर ते कमी करण्याऐवजी त्या मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. याचाच फायदा कंपन्या घेतात आणि महिलांकडून जास्त पैसे आकारतात. ही आता कंपन्यांची एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनली आहे.