Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

New Smartphone: तुम्हाला माहितीये या नवीन स्मार्टफोनबद्दल; आयफोन सोडून खरेदीदारांची यासाठी होतेय झुंबड!

Nothing Phone 2 Smartphone launched tomorrow

Image Source : Image Source : tech.hindustantimes.com

New Smartphone: तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला ना! आयफोन सोडून ग्राहक अशा कोणत्या नवीन स्मार्टफोनच्या खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तर मित्रांनो, हा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. पण त्याची विक्री अजून सुरू झालेली नाही. पण त्यापूर्वीच सुमारे 1 कोटीहून अधिक मोबाईल लव्हर ग्राहकांनी या फोनसाठी Notify Me हे बटण दाबून उत्स्कुता दाखवली आहे.

मित्रांनो, आपण ज्या स्मार्टफोनबद्दल बोलत आहोत. तो भारतात लॉन्च झाला आहे; पण त्याची विक्री अजून सुरू झालेली नाही. ग्लोबल मार्केटमध्ये याचे लॉन्चिंग व खरेदी-विक्री सुरू झाले असून, सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. हा स्मार्टफोन लॉन्च होण्यापूर्वीच त्याच्या युनिक फीचर्सची चर्चा रंगली होती. आता तर प्रत्यक्षात हा फोन लोकांच्या हातात पडणार आहे. यासाठीही लोक खूप उत्सुक आहेत, हे सर्व आम्ही तुम्हाला आमच्या मनाचे नाही तर कंपनीने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमधून सांगत आहोत.

शुक्रवारपासून करता येणार खरेदी

कंपनीने फोनची विक्री सुरू होण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले आहे की, ग्राहकांनी आमच्या या प्रोडक्टला भरघोस असा रिस्पॉन्स दिला आहे. तर हा फोन भारतात 21 जुलैला म्हणजे शुक्रवारी ई-कॉमर्स साईटवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे आणि या स्मार्टफोनचे नाव आहे, Nothing Phone 2.

कंपनीला या Nothing Phone 2 फोनला ग्राहकांकडून प्री-ऑर्डरसाठी जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या फोनचा पहिला स्टॉक संपला आहे. आता तर याची रेकॉर्ड-ब्रेक होऊ लागली आहे. जवळपास 1 कोटीहून अधिक ग्राहकांनी या फोनसाठी कंपनीच्या साईटवर जाऊन Notify Me या बटणावर क्लिक करून आपली इच्छा व्यक्ती केली आहे. म्हणजेच 1 कोटी ग्राहक या फोनसाठी इच्छुक आहेत.

ॲण्ड्रॉईडमधील ॲपल आयफोन

बऱ्याच टेक-सॅव्ही मोबाईल युझर्सचे म्हणणे आहे की, हा फोन म्हणजे ॲण्ड्रॉईड सेगमेंटमधील ॲपल आयफोन आहे. यातील ढासू फीचर्समुळे अनेक ॲपल सोडून Nothing Phone 2 ला आपलेसे करू शकतात. मिडियामध्ये आलेल्या माहितीनुसार, वॉल स्ट्रीट बँकेमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने Nothing Phone खरेदी केल्यानंतर iPhone 14 Pro Max विकण्याचा निर्णय घेतला होता.

Nothing Phone मधील फीचर्सचा विचार केला तर याची ग्लिफ डिझाईन हे खास वैशिष्ट्य आहे. हा फोन ॲडव्हान्स अल्गोरिदमसोबतच 50 मेगापिक्सेलचे ड्युअल रिअर कॅमेरा असणार आहे. याचा डिस्प्ले 6.7 इंच आहे.