आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गॅझेट्सनं नथिंगनं बाजारपेठेचं लक्ष वेधलं आहे. नथिंग फोन 1नंतर आता कंपनी अखेर नथिंग फोन 2 लाँच करणार आहे. 11 जुलै रोजी तो सादर केला जाणार आहे. लॉन्च होण्यापूर्वीच या फोनशी संबंधित विविध फीचर्स समोर येत आहेत. कंपनीचे सीईओ असलेल्या कार्ल पेई (CEO Carl Pei) यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये यूएसबी टाइप सी (USB Type-C) केबल दिसत आहे. पारदर्शक डिझाइन (Transparent design) असलेली ही यूएसबी केबल पाहून ही येणाऱ्या स्मार्टफोनची टाइप सी केबल असल्याचं दिसून येत आहे.
ट्रान्सपरन्ट डिझाइनसह येणार यूएसबी
नथिंगचे सीईओ कार्ल पेई यांनी त्यांच्या यूएसबी टाइप सी केबलचं डिझाइन उघड (Reveal) करण्यापूर्वी आणखी एक ट्विट केलं आहे. 'बघा आमची नवीन यूएसबी टाइप सी केबल किती चांगली आहे.' (Man our new USB Type-C cable is nice), असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कार्ल पेई यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये पारदर्शक लूकसोबतच त्यावर 'नथिंग'चं ब्रँडिंगही करण्यात आलं आहे. एकूणच केबल पांढर्या रंगाची असली तरी ती नथिंग फोन 1 सोबत येणाऱ्या केबलसारखीच आहे.
— Carl Pei (@getpeid) June 19, 2023
कधी लॉन्च होणार नथिंग 2?
नथिंग फोन 2 (Nothing Phone 2) 11 जुलै रोजी रात्री 8:30 वाजता बाजारात उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8+ जनरेशन 1 (Snapdragon 8+ Gen 1) प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. कंपनीनं कन्फर्म केलं आहे, की फोनमध्ये 120Hzच्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले असणार आहे. याशिवाय नथिंगच्या या फोनमध्ये 4700mAh बॅटरी असणार आहे. कंपनीनं आपल्या पहिल्या अँड्रॉइड स्मार्टफोन नथिंग फोन 1मध्ये 4,500mAhची बॅटरी दिली होती. त्यामुळे हा नवा फोन मागच्या मॉडेलपेक्षा 200mAh अधिकच्या बॅटरीसह मिळणार आहे.
Man our new USB Type-C cable is *nice*
— Carl Pei (@getpeid) June 19, 2023
किंमत किती?
नथिंग फोन 2ची संभाव्य किंमत 45,000 ते 50,000 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीनं याबाबत अद्याप तरी कोणतीही माहिती दिलेली नाही. पण किंमतीचा अंदाज वर्तवणारं एखादं ट्विट केलं जाण्याची शक्यतादेखील आहे. किंवा किंमतीविषयी कुतूहल निर्माण होईल, असं काहीतरी कंपनी नक्कीच शेअर करेल. ज्यामुळे ब्रँडिंग होण्यासही मदत होणार आहे.