Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Salary Account Benefits: सॅलरी अकाउंटवर मिळणाऱ्या 'या' सुविधांबद्दल तुम्हाला माहीत आहे का?

Salary Account Benefits

Salary Account Benefits: नोकरी करणाऱ्या प्रत्येकाकडे त्याचे स्वतःचे सॅलरी अकाउंट (Salary Account) असते. या अकाउंटवर अनेक वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ज्याची अनेकांना माहिती नसते. आज त्या सुविधांबद्दल जाणून घेणार आहोत.

तुम्ही कोणतीही नवीन नोकरी जॉईन केली की, तुमची कंपनी तुमचा पगार एका विशिष्ट बँकेच्या खात्यात जमा करते. तुमचा पगार दरमहा ज्या बँक खात्यात जमा होतो, त्याला सॅलरी अकाउंट (Salary Account) म्हणतात. हे बँक खाते कंपनीच्या नियमांतर्गत सुरू केले जाते. या बँक खात्यावर कर्मचाऱ्याला सामान्य सेव्हिंग खात्यावरील सुविधांपेक्षा जास्त सुविधा दिल्या जातात. ज्याबद्दल बऱ्याच कर्मचाऱ्यांना माहिती नसते. तर आज आपण सॅलरी अकाउंटवर मिळणाऱ्या वेगवेगळ्या सुविधांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याबद्दल बँका ग्राहकांना सांगत नाहीत.

सॅलरी अकाउंटवर मिळणाऱ्या सुविधा

कर्जाची सुविधा

सॅलरी अकाउंटवर खातेधारकाला वैयक्तिक कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. याशिवाय अनेक वेगवेगळ्या ऑफर्स खातेधारकाला दिल्या जातात. यामध्ये प्री-ॲप्रुव्हड लोनची (Pre-Approved Loan) सुविधा दिली जाते. याशिवाय गृहकर्ज (Home Loan) आणि वाहन कर्जाची (Vehical Loan) सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते.

मोफत पासबुक आणि चेकबुकची सुविधा

सॅलरी अकाउंटवर खातेधारकांना चेकबुक, पासबुक आणि ई-स्टेटमेंटची सुविधा मिळते. यासोबतच खातेधारकाला बँकिंग मॅसेजसाठी (SMS) शुल्क भरावे लागत नाही. ही सुविधा सॅलर अकाउंटवर मोफत दिली जाते.

मोफत विमा सुविधा

सॅलरी अकाउंटवर खातेधारकाला 20 लाख रुपयांपर्यंतचा वैयक्तिक अपघात विमा उपलब्ध करून दिला जातो. ही रक्कम प्रत्येक बँकेनुसार बदलू शकते.

ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध

खातेधारकाला सॅलरी अकाउंटवर ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येते. ओव्हरड्राफ्टची सुविधा म्हणजे खातेधारकाला त्याच्या बँक खात्यात रक्कम शिल्लक नसली तरीही, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पैसे काढता येतात. ही सुविधा 2 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीकरीता देण्यात येते. हा कालावधी प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळा असू शकतो.

मोफत ऑनलाईन व्यवहाराची सुविधा

काही बँका खातेधारकांना त्यांच्या सॅलरी अकाउंटवर मोफत ऑनलाईन व्यवहाराची सुविधा देतात. या अंतर्गत, NEFT, RTGS सारख्या पैसे हस्तांतरणाच्या सुविधा विनामूल्य वापरता येतात. याशिवाय अनेक बँका IMPS (Immediate Payment Service) ची सुविधा देखील देतात. यामध्ये खातेधारकाला जलद आर्थिक व्यवहार करता येतात.

मोफत एटीएम (ATM) सुविधा

सॅलरी अकाउंटवर खातेधारकाला मोफत एटीएमची सुविधा पुरवली जाते. खातेधारकाला बँकेच्या खात्यावरून पैसे काढण्यासाठी शुल्क भरावे लागत नाही. हा नियम बॅंकेनुसार बदलू शकतो. महत्त्वाचे म्हणजे हे बँक खाते झीरो बॅलेन्स (Zero Balance) असल्याने खात्यावर पैसे शिल्लक ठेवण्याची मर्यादा नसते.

Source: hindi.news18.com