भारतात गेल्या काही वर्षांमध्ये क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. डिजिटल पेमेंटच्या युगात क्रेडिट कार्ड हे अतिशय महत्त्वाचे आर्थिक साधन म्हणून उदयाला आले आहे. सध्या अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये क्रेडिट कार्ड हमखास वापरले जाते. याच क्रेडिट कार्डवर बँकेकडून अनेक वेगवेगळ्या सुविधा पुरविल्या जातात. ज्यामध्ये सिक्युरिटी, रिवॉर्ड पॉईंट्स, डिस्काउंट ऑफर यासारखी वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आलेली असतात. मात्र ठराविक बँकेच्या क्रेडिट कार्डवर 'इंटरेस्ट फ्री पिरियड' हे फीचर दिलेले असते. या फिचर बद्दल अनेकांना कल्पनाही नसते. जर तुम्हीही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल आणि तुमच्या कार्डवर इंटरेस्ट फ्री पीरियड हे फीचर दिले असेल, तर ते नक्की काय आहे आणि त्याचा फायदा काय? जाणून घेऊयात.
इंटरेस्ट फ्री पीरियड फीचर बद्दल जाणून घ्या
क्रेडिट कार्डवरील इंटरेस्ट फ्री पीरियड फीचर म्हणजे व्याजमुक्त कालावधी किंवा वाढीव कालावधी होय. या कालावधीत कार्डधारक कोणत्याही व्याजाशिवाय बिल भरू शकतो. हे बिल भरण्यासाठी एक ठराविक कालावधी निश्चित करून दिलेला असतो. हा कालावधी सहसा 20 ते 50 दिवसांचा असतो.
व्याजमुक्त कालावधी प्रत्येक कंपनीच्या पॉलिसीनुसार बदलू शकतो. या सुविधेचा वापर करून तुम्ही सर्वाधिक बचत करू शकता. या कालावधीत क्रेडिट कार्ड वापरकर्त्याला कोणतेही अतिरिक्त व्याज भरावे लागत नाही. अशा स्थितीत कार्डधारक आरामात खरेदी करून व्याजमुक्त राहू शकतो.
इंटरेस्ट फ्री पीरियडचे फायदे जाणून घ्या
क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी इंटरेस्ट फ्री पीरियड हा आर्थिक दिलासा देणारा काळ असतो. कार्डधारक तात्काळ परतफेडीची चिंता न करता आवश्यक खरेदी करू शकतात आणि केवळ थकबाकीची रक्कम भरू शकतात.
इंटरेस्ट फ्री पीरियड या फीचरचा वापर केल्याने क्रेडिट कार्डच्या स्कोरवर सकारात्मक परिणाम होताना पाहायला मिळतो. वेळेवर पेमेंट करणे आणि क्रेडिट कार्डचा सुज्ञपणे वापर केल्याने चांगला क्रेडिट स्कोर तयार होण्यासाठी मदत होते. चांगल्या क्रेडिट स्कोरमुळे अनेक फायदे कार्डधारकाला मिळतात.
इंटरेस्ट फ्री पीरियड या फीचरचा लाभ घेण्याचे मुख्य कारण म्हणजे अतिरिक्त रकमेचा खर्च टाळणे. या कालावधीत संपूर्ण थकबाकी भरून क्रेडिट कार्डधारक त्याच्या खरेदीवर कोणतेही व्याज देण्यासाठी बांधील नसतो. त्यामुळे त्यांचे अतिरिक्त पैसे वाचतात.
Source: hindi.financialexpress.com