Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

डिजिटल वॉलेट (digital wallet) तुमच्याकडे आहे का? त्यातून तुम्ही कसा खर्च करता?

डिजिटल वॉलेट (digital wallet) तुमच्याकडे आहे का? त्यातून तुम्ही कसा खर्च करता?

दैनंदिन खर्चाची (expenses) रक्कम भरताना प्रत्येक वेळी व्यापारी सेवांच्या टर्मिनलचा (terminal) संपर्क आपल्या बॅंक खात्याशी येऊ न देता थेट डिजीटली पेमेंट करण्यासाठी वॉलेट सुविधा फार उपयोगी पडत असते.

काहीही खर्च करायचा म्हटलं तर आजकाल मोबाईल काढला जातो. हो, मोबाईलच... हल्ली पैशाचं पाकिट कोण कुठं जास्त वापरतं. काढला मोबाईल केलं जी-पे (Google Pay) किंवा कॅमेरा सुरू केला नि क्यूआर कोड (QR Code)ने स्कॅन केलं, झालं काम फत्ते. डिजिटल (digital) पैसे हस्तांतराच्या (transfer) अनेक पद्धती आज अस्तित्वात आल्या आहेत. वॉलेट (wallet) हे त्यातलंच एक. अतिशय महत्त्वाची सुविधा याद्वारे उपलब्ध झाली आहे.

इंग्रजीत वॉलेट हा शब्द पैशाची पर्स किंवा पैशांचे पाकिट या अर्थाने वापरला जातो. बाजारात किंवा दररोजच्या लहान मोठ्या खर्चांसाठी आपण घरातली कॅशबॉक्स (cashbox) किंवा तिजोरी घेऊन बाहेर पडत नाही. त्याऐवजी पाकिटात थोडीशी रोकड घेऊन त्यातूनच लहान मोठे खर्च करतो. डिजिटल वॉलेटही (digital wallet) नेमकी याच पद्धतीने काम करते. डिजिटल वॉलेट हे एक प्रिपेड पेमेंट (prepaid payment) इन्स्ट्रूमेंट आहे. त्यात आपण गरजेनुसार बॅंक खात्यातून ठराविक रक्कम हस्तांतरित करून तिथे साठवून ठेवू शकतो आणि दैनंदिन व्यवहारात त्या वॉलेटमधून लहानसहान पेमेंट डिजिटल पद्धतीने करू शकतो.

आज पैशाच्या डिजिटल हस्तांतराच्या अनेक सुविधा एकाच अपमध्ये उपलब्ध होऊ लागल्या आहेत. काही बॅंकांच्या स्वतःच्या अ‍ॅपमधून पैसे हस्तांतरित करण्याच्या इतर सुविधांसोबत वॉलेट सुविधाही दिलेली दिसते. त्याचप्रमाणे वॉलेट सुविधेसाठी तयार झालेली अ‍ॅपही अलीकडे यूपीआयसारख्या सेवा अंतर्भूत करू लागली आहेत. एकाच अ‍ॅपमधून अनेक सेवा मिळू लागल्याने वॉलेटचे वेगळेपण चटकन लक्षात येत नाही. क्यूआर कोड (QR) स्कॅन करून पेमेंट करण्यासारखी पद्धत यूपीआय (UPI) आणि वॉलेट (wallet) यांच्यात जवळपास समान आहे. त्यामुळे तो फरक अनेकांच्या पटकन लक्षातही येणार नाही.

पेमेंट ग्राहकाच्या बॅंक खात्यातून दुकानदाराच्या बॅंक खात्यात जमा

गुगुल प्लेस्टोअरवर फक्त यूपीआय सेवा देणारी आणि यूपीआयसह वॉलेट सेवा देणारी अ‍ॅपही आहेत. यूपीआय सेवा आणि वॉलेट सेवा यांच्यातला सर्वात महत्त्वाचा फरक हा आहे. तो म्हणजे यूपीआय सेवेत रक्कम एका बॅंक खात्यातून दुसऱ्या बॅंक खात्यात अशी थेट हस्तांतरित होते. म्हणजे एका दुकानात आपण खरेदी केली आणि यूपीआयनं पेमेंट केलं तर ते पेमेंट ग्राहकाच्या बॅंक खात्यातून दुकानदाराच्या बॅंक खात्यात (bank account) थेट हस्तांतरित होतं. यूपीआय सेवा देणारी जर बॅंके शिवाय वेगळी यंत्रणा असेल तर ती रक्कम साठवता येण्याची सुविधा नाही किंवा तिथे रक्कम साठवण्याचा मार्गच नसतो. वॉलेट सेवेत मात्र सेवा प्रदात्याकडे रक्कम साठून राहते आणि तिथून गरजेनुसार आपल्या खरेदीसाठी वापरली जाते किंवा परत बॅंकेच्या खात्यात जमा करायची असेल तर तीही करता येते.

यूपीआय सेवा (UPI Service)

भारतात अलीकडे बहुसंख्य बॅंकांनी स्वतःची यूपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यातुलनेत वॉलेटसारखी सुविधा बॅंकांच्या अ‍ॅपवर कमी प्रमाणात आढळते. यूपीआय सेवा ही आपल्या बॅंक खात्यातून रक्कम थेट काढणं किंवा जमा करणं याला मदत करते. याचा अर्थ पैशाच्या प्रत्येक देवाणघेवाणीत बॅंकेच्या खात्याला एक्सेस केला जातो. त्यामुळे यूपीआयद्वारे केलेल्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनची नोंद ही तुमच्या संबंधित बॅंक खात्याच्या पासबुकमध्ये होते. याचाच दुसरा अर्थ असाही आहे की, ग्राहकाच्या बॅंक खात्याशी बाहेरचा एक्सेस मोठ्या प्रमाणात वाढतो.

व्यवहाराच्या नोंदी वॉलेट हिस्ट्रीमध्ये पाहू शकता

ज्यांना वेगवेगळ्या कारणासाठी बॅंक अकाऊंट स्टेटमेंट शेअर करावे लागते त्यांच्यासाठी यूपीआयद्वारे सगळ्या लहानमोठ्या रकमांच्या नोंदी असलेले लांबलचक अकाऊंट स्टेटमेंट सबमिट करणे कटकटीचे वाटू शकतं. वॉलेट अ‍ॅपद्वारे लहानसहान पेमेंट देण्याची सवय ठेवली तर मूळ बॅंक अकाऊंट स्टेटमेंटचा आकार आटोपशीर राहू शकतो. तरीही वॉलेटमधून केल्या जाणाऱ्या लहानसहान पेमेंटचे रेकॉर्ड हवे असल्यास ते वॉलेटमधून केलेल्या ट्रान्झॅक्शनच्या इतिहास वॉलेटमध्ये (wallet history) जमा राहतो आणि पाहता येतो.

अनेक ग्राहक मोबाईलमध्ये बॅंकेचे अ‍ॅप ठेवून त्याद्वारे बॅंक खाते अ‍ॅक्सेस करत नाहीत. अशा ग्राहकांना डीजीटल पेमेंट करण्यासाठी मोबाईलमध्ये वॉलेट अ‍ॅप उपयुक्त ठरतात. नेटबॅंकिंग किंवा कार्डाद्वारेही वॉलेट अ‍ॅपमध्ये पेसे भरता येतात आणि तिथून आवश्यकतेनुसार किरकोळ डिजिटल पेमेंट केली जातात.

वॉलेट सेवेत तुम्ही स्वतःहून बॅंक खात्यातून या सेवेसाठी ठराविक रक्कम काढली किंवा भरली तरच बॅंक खात्याच्या पासबुकमध्ये नोंद होते. मात्र वॉलेटमधून तुम्ही परस्पर लहानमोठ्या खरेदी किवा सेवांची बिले भरत असाल तर त्याची थेट नोंद बॅंकेच्या पासबुकवर होत नाही. वॉलेटच्या अ‍ॅपमध्ये तिथून काढल्या किंवा भरल्या गेलेल्या रकमांची नोंद वॉलेटच्या ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये (transaction history) पाहता येते.

वॉलेट सेवा देण्यासाठी प्रत्येकाला भारतात रिझर्व्ह बॅंकेची परवानगी घ्यावीच लागते आणि ज्यांनी वॉलेट सेवेसाठी परवानगी घेतली आहे; त्यांना आपल्या ग्राहकांची ओळख पटवावी लागते. अर्थात ग्राहकाची केवायसी (KYC) किंवा माहिती ठेवावी लागते. त्यामुळे बॅंकांच्या सेवांखेरीज ही वॉलेट सेवा जर थर्ड पार्टीकडून दिली जात असेल तर तिच्यासाठी केवायसी पूर्तता ही करावीच लागते.