अनेक जुन्या नाण्यांचा (Old coin) खच पडल्याचं आपण ऐकतो. अशा परिस्थितीत तुम्ही जुनी नाणी जमा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी मोठी असू शकते. कारण या जुन्या नोटा आणि नाणी तुम्हाला मोठी रक्कम मिळवून देऊ शकतात. या जुन्या नोटा आणि नाण्यांची किंमत आजच्या काळात खूप जास्त आहे. तुम्ही काहीही न करता घरी बसून पैसे कमवण्याचा विचार (Earning money) करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी गृहीत धरावी. टाइम्सबुलनं हे वृत्त दिलं आहे.
Table of contents [Show]
5 रुपयांच्या नाण्यातून कमाई
जुन्या नाण्यांमध्ये आपण 5 रुपयांच्या नाण्याचा विचार केला तर जुन्या नाण्यांची देवाणघेवाण करून तुम्ही 5 लाखांपर्यंतदेखील कमवू शकता. त्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. यातून कोणीही सहज पैसे कमवू शकतो. तुम्ही देखील या कमाईच्या मार्गात सहभागी होऊ शकता. त्यासाठीच्या काही अटी आहेत.
5 रुपयांच्या जुन्या नाण्याची वैशिष्ट्ये
या नाण्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. अशा स्थितीत जर तुम्ही 5 रुपये ठेवले असतील तर त्यातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. हे नाणं 1992मध्ये जारी केलं गेलं. यानंतर, त्याची रचना समोरच्या बाजूला हिंदी आणि इंग्रजीमध्ये दिसते. यासोबतच नाण्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला छोटी फुले असायला हवीत.
टांकसाळीची खूण आणि इतर बाबी
या अनोख्या नाण्याच्या खालच्या बाजूला नाण्याचं वर्ष आणि नाण्याच्या टांकसाळीची खूणही असावी. यानंतर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभाचं चित्र असावं आणि उजव्या बाजूला सत्यमेव जयतेही लिहिलेलं असायला हवं. नाण्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला इंग्लिशमध्ये भारत लिहिलेलं असावं.
काय करावं? पूर्ण प्रक्रिया
- नाणी विकण्यासाठी तुम्हाला क्विकर (Quikr.com) या वेबसाइटला व्हिजिट करावी लागेल.
- यानंतर स्वत:ची विक्रेता म्हणून नोंदणी करावी.
- जुन्या नाण्याच्या फोटोवर क्लिक करावं आणि अपलोड करावं.
- यानंतर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी टाकावा.
- वेबसाइट मागवलेल्या सर्व माहितीची पडताळणी करेल.