Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea: सणासुदीच्या काळात करू शकता 'हा' व्यवसाय

Handcraft Business

Handcraft Business: सणांच्या दिवसांमध्ये गृह सजावटीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या मातीच्या वस्तू आणि हॅन्ड क्राफ्ट वस्तूंचा व्यवसाय नागपूर शहरातील विजया वैंदस्कर या गेल्या 14 ते 15 वर्षांपासुन करीत आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी 7 महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. तर या व्यवसायामधून त्यांना वर्षाला 8 ते 10 लाख रुपयांचा नफा होत आहे.

Cold Press Oil Business: यंदा 6 सप्टेंबरला येणाऱ्या जन्माष्टमी पासुन ते दिवाळी पर्यंत विविध सण आहेत. या काळात नागरिक विविध आकर्षक वस्तुंनी आपले घर सजवतात. आकर्षक सजावटीची फुले, मातीचे विविध रंगांनी सजवलेले दिवे, मातीच्या विविध वस्तू, पेंटिग, दाराला लावायचे हॅन्डमेड तोरण यासारख्या विविध आकर्षक वस्तूंनी बाजारपेठ सजवलेली असते. ग्राहकांना अशाच गृह सजावटीसाठी लागणाऱ्या विविध हॅन्ड क्राफ्ट वस्तु तयार करण्याचे कार्य उद्योजिका विजया वैंदेस्कर करतात.

सहा हजारांच्या गुंतणुकीपासून सुरुवात

कॉलनीतील गरजू महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन द्यावा, यासाठी उद्योजिका विजया वैंदेस्कर यांनी 14 ते 15 वर्षांपूर्वी  गृह सजावटीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या मातीच्या वस्तु आणि हॅन्डक्राफ्ट वस्तू तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यावेळी त्यांनी केलेली गुंतवणूक केवळ 5 ते 6 हजार रुपये होती. आज त्यांचा वार्षिक नफा 8 ते 10 लाख रुपये आहे. यासोबतच गेल्या तीन वर्षांपासुन त्यांनी कोल्ड प्रेस ऑईलचा व्यवसाय सुरु केलेला आहे.

शहराबाहेरही जातोय माल

5 ते 6 हजार रुपयांची गुंतवणूक करुन त्यांनी वार्ली सेट तयार करणे, वॉल पिसेस, वूडन तोरण, वूडन रंगोली, मातीची लक्ष्मी पाऊले, करंडे, छोटे नंदा-दिप यासारख्या 100 ते 150 प्रकारच्या मातीच्या वस्तू हाताशी घेऊन 14 ते 15 वर्षांपूर्वी त्यांनी मार्केटिंग करणे सुरु केले. केवळ नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर हैद्राबाद, जयपूर, छिंदवाडा, यासारख्या विविध शहरांमध्ये विजया वैंगस्कर यांनी तयार केलेल्या शोभेच्या आकर्षक वस्तू आज त्यांची ओळख बनल्या आहेत. गुणवत्ता आणि सुंदरता यासाकरीता त्यांच्या हॅन्ड क्राफ्ट वस्तु ओळखल्या जातात.

सात महिलांना दिला रोजगार

उद्योजिका विजया वैंदेस्कर यांच्या गृह सजावटीच्या वस्तु आणि हॅन्ड क्राफ्ट व्यवसायाच्या माध्यमातून आज 7 महिलांना रोजगार मिळाला आहे. आज या 7 महिलांना देखील वर्षाला 50 हजार रुपयांचा रोजगार प्राप्त होतो.

कोल्ड प्रेस ऑईलचा व्यवसाय

तसेच गेल्या तीन वर्षांपासुन विजया यांनी कोल्ड प्रेस ऑईलचा व्यवसाय सुरु केला आहे. प्रकृतीच्या बाबतील स्वत:ला आलेल्या अनुभवावरुन त्यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायाकरिता त्यांनी 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच सोबत दोन कर्मचारी वेतन तत्वावर ठेवले आहेत. कोल्ड प्रेस ऑईल मध्ये शेंगदाना, जवस, मौहरी, तीळ, नारळ, सूर्यफूल, बादाम यासारख्या ऑईल्सचा समावेश आहे.

नफा वाढल्याने व्यवसायाच्या विस्ताराचे स्वप्न

यामध्ये फल्ली 320 रुपये किलो, जवस 400 रुपये किलो, सरसों 370 रुपये किलो, तीळ 450 रुपये किलो, नारळ 450 रुपये किलो, सनप्लावर ऑईल 450 रुपये किलो आणि बादामाचे तेल 3000 रुपये लिटर आहे. विजया यांनी पहिल्या वर्षाला ना नफा ना तोटा तत्वावर  व्यवसाय केला. तर गेल्या वर्षाला त्यांना 5 लाख रुपये नफा झाला. पुढल्या 5 वर्षात नागपूर शहरात 10 आऊटलेट काढण्याचा त्यांचा मानस आहे. तर पुढील 5 वर्षात 15 ते 20 लाखाचे वार्षीक उत्पन्न मिळविण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

अशा प्रकारे करतात मार्केटिंग

विजया या सोशल मिडिया, माऊथ पब्लिसिटी आणि विविध ठिकाणी लागणारे प्रदर्शन यामाध्यामातून त्यांच्या वस्तूंचे मार्केटिंग करतात. विजया यांना बेस्ट वुमन इंटरप्रेनियनशिप अवार्ड मिळाला आहे. पेंटिंग, क्राफ्ट या व्यवसायांमध्ये आवड असलेल्या या महिला देखील यासारखा व्यवसाय सुरु करु शकतात. ज्या माध्यमातून स्वत:च्या आर्थिक प्रगतीसोबत इतर गरजुंनाही रोजगार उपलब्ध करून देता येणार आहे.