Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget Shopping: महागाईत ही स्टायलिश रहा; अशी करा बजेट शॉपिंग

Budget Shopping

Budget Shopping: प्रत्येक महिन्यात ही अडचण आहे. किती ही खर्च वाचविण्याचा प्रयत्न केला, तरी शॉपिंगसाठी बजेटवर अधिक पैसा खर्च होतो. आता, प्रश्न पडला की, महिन्याला शॉपिंग करायची की नाही? पण आता तुम्ही शॉपिंगसाठी अधिक खर्च करण्याची चिंता सोडा. आम्ही खास तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. जसे की, कमी खर्चात, उत्तम शॉपिंग कशी करायची?

Budget Shopping: आजच्या जमान्यात स्टायलिश राहणे ही गरज बनली आहे. यासाठी कपडे व इतर गोष्टींची स्वस्तात शॉपिंग करण्याच्या काही ट्रिक्स आम्ही सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला कमी खर्चात, उत्तम शॉपिंग करता येईल. चला, तर मग स्मार्ट शॉपिंगसाठी करा, स्मार्ट खर्च.

सर्वप्रथम तुमची आवड समजून घ्या

सर्वप्रथम तुम्ही तुम्हाला आवडीनुसार शॉपिंग करायची आहे, तर तुम्हाला यामध्ये काय-काय खरेदी करायचे आहे, याचे नियोजन करणे आवश्यक आहे. या नियोजनमध्ये ठरवा की, बजेटनुसार या या कपडयावर इतकाच खर्च केला जाईल. जेणेकरून तुमची बचत होईन. जर खर्चावर नियंत्रण नसेल, तर बचत करणे खूप अवघड आहे. त्यामुळे बजेडटनुसार शॉपिंग प्लॅन करणे आवश्यक आहे.  

ऑफरमध्ये खरेदी करा

तुम्ही ज्या परिसरात राहता, त्या ठिकाणी विविध भागात शॉपिंग मॉल्स आणि फॅशन स्टोअर्स असतीलच. मग अशा ठिकाणी जावा, ज्या ठिकाणी ब्रॅंडेड कपडयांवर विविध ऑफर असतील. सोबतच अशा दुकानांबाबत अधिक माहिती जाणून घ्या. दुकानात गेल्यावर ऑफर जरी असली, तरी ती तुमच्या बजेटमध्ये बसते का याचा विचार करा अन् मगच खरेदी करा.  

ऑनलाइन खरेदी करा

सध्या सोशल मिडियाचा जमाना आहे. त्यामुळे ऑनलाइन खरेदीचेदेखील प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घरबसल्या मनपसंद कपडे मिळते. मात्र हे कपडे स्वस्तात खरेदी करायचे असेल, तर सेलची वाट पहा. खर्च वाचविण्यासाठी शक्यतो, सेल किंवा ऑफरमध्ये शॉपिंग करण्यावर जोर द्या. जेणेकरून तुमच्या खर्चात मोठी बचत होईल. शक्यतो, ऑनलाइन व ऑफलाइनचे भावदेखील तपासून पहा. ज्या ठिकाणी स्वस्तात शॉपिंग करता येईल, त्या ठिकाणी शॉपिंग करण्यास प्राधान्य द्या.

बार्गेन  करायला शिका

तुम्हाला जर पैशांची बचत करायची असेल, तर बार्गेन करणे आले पाहिजे. बार्गेन म्हणजेच शॉपिंग करताना त्या वस्तूंच्या किंमती दुकादाराशी बोलून बोलून कमी करायला लावणे. जेणेकरून तुम्हाला तुमच्या बजेटनुसार शॉपिंग करणे सोपे होईल.