Diwali : 13 नोव्हेंबर रोजी दिवाळीचा सण असल्याने दुकानांमध्ये प्रचंड गर्दी उसळलेली आहे. दिवाळीच्या निमित्ताने नागरिक घराची साफ-सफाई करतात. घर सजावट करतात. नविन कपडे खरेदी करतात. पूजेचे साहित्य खरेदी करतात. सोने-चांदी, नवीन फर्निचर, इलेक्ट्रॉनिकचे सामान खरेदी करतात. त्यामुळे मार्केटमध्ये कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूं
यंदा मार्केटमध्ये चायना ऐवजी इंडीयन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची रेलचेल दिसून येत आहे. समयी, इलेक्ट्रॉनिक्सचे दिवे, पाण्यावर चालणारे दिवे आणि शंकरजीची पिंड, नवनवीन सिरीज, वॉटर फॉल, भिंतीवर अडकवायच्या इलेक्ट्रॉनिक शोभेच्या वस्तू, इत्यादी घर सजावटीच्या वस्तू इलेक्ट्रॉनिक मार्केट मध्ये उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक मार्केट मध्ये 20 रुपयांपासून 1400 रुपयांपर्यंत वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत. दिवाळीच्या या सिझन मध्ये संपूर्ण मार्केटचं टर्न ओव्हर 150 कोटींपेक्षा अधिक आहे.
कपड्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल
नागपूर शहरातील इतवारी मार्केट मधील कपड्यांच्या दुकानामध्ये ग्राहकांची रेलचेल सुरु झाली आहे. नवनवीन कपड्यांनी, घर सजावटीच्या पडद्यांनी संपूर्ण मार्केट सजले आहे. नागपूर शहरातील कपड्यांच्या मार्केट मध्ये दिवाळी सणाच्या पर्वावर 300 ते 400 कोटी रुपयांची उलाढाल होत असते.
घर सजावटीच्या वस्तू
सध्या मार्केट मध्ये घर सजावटी करीता माती पासून निर्मित विविध आकर्षक वस्तूंना प्रचंड मागणी आहे. माती पासून निर्मित कासव, दिवे, फुले सजवण्याचं पॉट, दाराला सजवण्याचं तोरण, मातीच्या शोभेच्या वस्तू, इत्यादी अनेक वस्तूंना सध्या प्रचंड मागणी आहे. 50 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंतच्या अनेक वस्तूं सध्या मार्केट मध्ये उपलब्ध आहे. तसेच टेराकोटा आणि शाडूच्या मातीपासून निर्मित लक्ष्मी मातेच्या मूर्ती 500 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.