The number of paid subscribers on Disney Plus Hotstar increased: भारतातील प्रसिद्ध ओटीटी (Over The Top) प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारच्या (Disney+ Hotstar) पेड सबस्क्रिप्शमध्ये 42 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या खात्यात मागील वर्षाच्या तुलनेत 18 दशलक्षचा फायदा झाला आहे. यावर्षी आयपील (IPL) स्ट्रिमिंगचे हक्क हॉटस्टारकडे नसल्यामुळे येत्या काळात पेड सबस्क्राईबरच्या वाढीत घट होण्याचा अंदाज हॉटस्टारने वर्तवला आहे.
डिस्ने प्लस हॉटस्टार प्लॅटफॉर्मचे 2021 सालात झालेल्या पेड सबस्क्रिप्शनमुळे 43.3 दशलक्षचा फायदा कंपनीला झाला होता. मात्र 2022 वर्षात 42 टक्क्यांनी पेड सबस्क्रिप्शन वाढल्यामुळे कंपनीला 18 दशलक्षांचा फायदा झाला असून, खात्यात 61.3 दशलक्ष जमा झाले आहेत.
2022 वर्षात, वायकॉम 18 कंपनीने 2023 पासून ते 2027 पर्यंतचे इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) सामने लाईव्ह दाखवण्याचे हक्क मिळवले आहेत. यामुळे हॉटस्टारला सबस्क्रिप्शनसह, जाहिरातीही कमी येतील असा अंदाज आहे. यामुळे साधारण 523 दशलक्ष महसूल कमी येण्याची शक्यता आहे
डिस्ने प्लस हॉटस्टॉर या ओटीटी माध्यमाला सर्वाधिक सबस्क्रिप्शन येण्यामागे रिलायन्स जियोची साथ आहे. जियोच्या ग्राहकांना त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये हॉटस्टार हे माध्यम वापरण्याची सुविधा कमी किंमतीत किंवा त्याच किंमतीत मिळते. यामुळे हॉटस्टारचे पेड सबस्क्रायबर 27 टक्क्यांनी वाढले आहेत.
डिस्ने प्लस हॉटस्टारचे आयपीएल सामने दाखवण्याचे अधिकार गेल्याने, हॉटस्टारने त्यांचा मोर्चा सिनेमांकडे वळवला आहे. सिनेमांचे अधिकाधिक हक्क विकत घेऊन ते प्रदर्शित करण्याकडे कंपनीचा कल आहे. ज्यामुळे आयपीएलमुळे होणार तोटा भरून काढता येईल.