Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Car Insurance: कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि Own Damage कार इन्शुरन्समध्ये फरक काय? कोणती पॉलिसी ठरेल फायद्याची

Own Damage insurance

कारचा अपघात झाल्यास किंवा इतर काही कारणांमुळे नुकसान झाल्यास खर्चाने खिसा रिकामा होऊ शकतो. फक्त थर्ड पार्टी विम्याने तुमच्या कारचे नुकसान भरून निघणार नाही. Own damage आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा पॉलिसी फायद्याची ठरू शकते. या दोन्ही पॉलिसीतील फरक काय पाहूया.

Car Insurance: कोणत्याही वाहनाला थर्ड पार्टी विमा संरक्षण कायद्यानुसार अनिवार्य असतो. तर कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि Own Damage इन्शुरन्स कायद्यानुसार अनिवार्य नाही. मात्र, फक्त थर्ड पार्टी इन्शुरन्स पुरेसा आहे का? तर नक्कीच नाही. या लेखात पाहूया कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि ‘ओन डॅमेज’ इन्शुरन्स म्हणजे काय? यातील कोणता विमा योग्य ठरू शकतो.

थर्ड पार्टी विमा म्हणजे काय?

सर्वप्रथम थर्ड पार्टी विमा पॉलिसी म्हणजे काय ते पाहूया. तुमच्या वाहनाची धडक बसून एखादी व्यक्ती जखमी झाली किंवा मृत्यू पावली तसेच कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर याची भरपाई थर्ड पार्टी विमा पॉलिसीद्वारे भरून निघते. मोटार व्हेइकल कायद्यानुसार हा विमा सर्व वाहनांना अनिवार्य आहे. मात्र, या विम्यातून तुमच्या स्वत:च्या गाडीला झालेले नुकसान कव्हर होत नाही. म्हणजेच तुमच्या गाडीचे झालेले नुकसान स्वत: पैसे घालून भरून काढावे लागेल.  

नव्या कारच्या किंमती दहा लाख किंवा त्यापुढेही गेल्या आहेत. (own damage and comprehensive insurance) अपघात किंवा इतर काही कारणांमुळे गाडीचे नुकसान झाल्यास दुरूस्तीचा खर्च लाखांमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे ओन डॅमेज किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा पॉलिसी असणे अत्यंत आवश्यक आहे. 

Own Damage इन्शुरन्स म्हणजे काय?

'ओन डॅमेज' पॉलिसीतून तुमच्या स्वत:च्या गाडीला नुकसानीपासून संरक्षण मिळते. जेव्हा तुमच्याकडे आधीपासूनच थर्ड पार्टी कार विमा असेल अशा परिस्थितीत ओन डॅमेज विमा फायद्याचा ठरेल. कारण, थर्ड पार्टी विम्यातून तुमच्या स्वत:च्या गाडीचे नुकसान भरून निघणार नाही. फक्त तुमच्या कारमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यापासून संरक्षण मिळेल. 

अपघात, पूर, भूकंप, वादळ, दरड कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्ती, चोरी, दंगल, मानवनिर्मिती आपत्तीमध्ये जर तुमच्या कारचे नुकसान झाले तर ते Own Damage पॉलिसीद्वारे भरून निघेल. 

कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा पॉलिसी म्हणजे काय?

जर तुमच्याकडे वरील दोन्ही पॉलिसी नसतील तर तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा पॉलिसी खरेदी करू शकता. (Which type of car Insurance is better) या पॉलिसीतून थर्ड पार्टी आणि तुमच्या स्वत:च्या गाडीचे नुकसानही भरून निघेल. एकच विमा पॉलिसी दोन्हींचे संरक्षण देईल. मात्र, या पॉलिसीचा प्रिमियम जास्त असेल.

सर्वाधिक संरक्षण तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा पॉलिसीद्वारे मिळेल. थर्ड पार्टी आणि ओन डॅमेज असा दोन वेगळ्या पॉलिसी खरेदी करण्याऐवजी कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी खरेदी केल्यास एकाच पॉलिसीत सर्व फायदे मिळतील. त्यासोबतच संरक्षणही जास्त मिळेल.