Most Expensive Diamond Necklace : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या घरी मागची तीन वर्षं कुठला ना कुठला लग्न समारंभ सुरू आहे. त्यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा लग्न सोहळा, मग मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा सोहळा आणि यावर्षी धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा रोका सोहळा. शिवाय ईशाची दोन जुळी मुलं आणि आकाश अंबानीचा मुलगा पृथ्वी यांचं स्वागतही अंबानी कुटुंबीयांनी दणक्यात केलं.
या सगळ्या समारंभांमध्ये दिसला अंबानी कुटुंबीयांचा उंची आणि शाही अंदाज. त्यांनी घातलेला पेहराव आणि दागिने यांची चर्चा होतच होती. त्यातच आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे मुकेश आणि नीता अंबानी यांनी थोरली सून श्लोका मेहताला लग्नात भेट दिलेला नेकलेस. हा नेकलेस चक्क 450 कोटी रुपयांचा आहे! आणि जगातल्या भारी नेकलेसपैकी हा एक असल्याची चर्चा अचानक सुरू झाली आहे.
450 कोटीच्या नेकलेसची वैशिष्ट्यं
श्लोका अंबानीला हा हिऱ्याचा नेकलेस नीता अंबानी यांनी एका लग्न विधीच्या दरम्यान दिला. अर्थातच, तो ऑर्डर करून बनवून घेण्यात आला होता. जगप्रसिद्ध लेबानीज ज्वेलर्सकडून हा नेकलेस खास श्लोकासाठी तयार करून घेण्यात आला. या नेकलेसमध्ये मध्यभागी मोठा हिऱ्याचा खडा आहे. हा खडा फक्त 407.48 कॅरेटचा आहे. या मोठ्या हिऱ्यासह या नेकलेसमध्ये आणखी 91 हिरे आहेत. हे 91 हिऱ्याचे खडे 200 कॅरेटचे आहेत. जवळपास 600 कॅरेटच्या या हिऱ्यांची तेव्हाची किंमत आहे 450 कोटी.
सध्या 2023 मध्ये या नेकलेसचं मूल्य वाढून 60 दशलक्ष अमेरिकन डॉलर किंवा 491 कोटी रुपये इतकं झालं आहे.
या नेकलेसची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉडमध्ये सुद्धा केली आहे. त्यांनी यातल्या हिऱ्याची नोंद ‘जगातला सर्वात मौल्यवान हिरा’ ठरला होता. विशेष म्हणजे या नेकलेसची डिझाईन कोणी कॉपी करु शकत नाही वा अशाप्रमाणेच दुसरा पीस सुद्धा कोणाला तयार करता येणार नाही असा दावा लेबानीज ज्वेलर्सनी केला आहे.
Behold the most expensive necklace ever created ― The L'Incomparable Diamond Necklace, only made possible by Mouawad. #Mouawad #MouawadDiamondHouse #RareJewels #Diamond #GuinnessWorldRecordhttps://t.co/0dlypdX1MH pic.twitter.com/Zf28a5CWa1
— Mouawad (@mouawad) August 2, 2018
अंबानी कुटुंबीयाची चर्चा
मुकेश अंबानी जे जगभरातील श्रीमंताच्या यादीत नवव्या स्थानावर आहेत. तर आशियातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ति आहेत. त्यांच्या अब्जाधिश किंमतीचे घरापासुन त्याचे वैयक्तिक आयुष्यावर लोकांचे फार लक्ष असते. नुकताच बीकेसीमध्ये त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी योजिलेल्या नीता अंबानी कल्चरल सेंटरचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांची श्रीमंती आणि लोकप्रियता पाहायला मिळाली.
या कार्यक्रमामध्ये अनंत अंबानी यांच्या महागड्या ब्रॉचची आणि राधिका मर्चंट हिंच्या 18 कोटीच्या घड्याळाची आणि 2 कोटीच्या हर्मस बॅगची सुद्धा चर्चा मीडियामध्ये रंगली होती.
जगातले इतर महागडे नेकलेस
श्लोका मेहताकडे असलेला हा नेकलेस जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा नेकलेस आहे. या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे प्रसिद्ध चायनीज डिझायनर वॅलेस चॅन यांनी बनवलेला ‘द हेरिटेज इन ब्लूम’ हा नेकलेस. हाँग काँगमधल्या एका रिटेल व्यापाऱ्याने 200 दशलक्ष अमेरिकन डॉलरला हा नेकलेस चॅन यांच्याकडून बनवून घेतला होता.
दुसऱ्या क्रमांकाचा मौल्यवान नेकलेस आता श्लोका अंबानी यांच्याकडे आहे. त्या मागोमाग तिसरा मौल्यवान नेकलेस टायटॅनिक या हॉलिवूडपटात अभिनेत्री केट विन्सलेट यांनी घातला होता. त्याची किंमत 22 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती. चौथा क्रमांक लागतो ‘हार्ट ऑफ किंग्डम’ या 14 दशलक्ष डॉलर किमतीच्या नेकलेसचा. पण, या नेकलेसची मालकी कुणाकडे आहे ते उघड झालेलं नाही.
जगातले पहिले अकरा नेकलेस हे तीस लाख डॉलर किंवा त्याच्या वरच्या किमतींचे आहेत.