Lower Edible Oil Prices In Global Market : दुधाचा पुरवठा करणाऱ्या मदर डेअरीने आपल्या खाद्य तेलाच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. मदर डेअरीने तेलाची किंमत पॉकेटावर छापील एमआरपी वरुन 10 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दरांसह पुढील आठवड्यापासून पॅकिंग उपलब्ध होणार असल्याचे, आणि जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्यामुळे तेलाच्या किमतीत ही कपात करण्यात आली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
तेलाच्या नवीन किमती
धारा तेलाच्या दरात कपात केल्यानंतर धाराचे रिफाइंड तेल आता 200 रुपये प्रति लिटरवर आले आहे. त्याचप्रमाणे धारा काची घणी मोहरीच्या तेलाची एमआरपी 160 रुपये प्रति लिटर आणि धारा मोहरीच्या तेलाची एमआरपी 158 रुपये लिटर असेल. यासह धाराचे रिफाइंड केशर तेल आता 150 रुपये लिटर आणि खोबरेल तेल 230 रुपये प्रति लिटर दराने विकले जाईल.
'सर्व धारा खाद्यतेल उत्पादनांच्या एमआरपीमध्ये प्रति लिटर 10 रुपयांपर्यंत कपात केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या घसरलेल्या किमती आणि देशांतर्गत मोहरीसारख्या तेलबिया पिकांच्या उपलब्धतेत झालेली सुधारणा लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे ',अशी माहिती मदर डेअरीच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात दिली आहे.
दुधाच्या उत्पादनांचा प्रमुख पुरवठार - मदर डेअरी
मदर डेअरी,मुख्यत: दिल्ली आणि एनसीआर प्रदेशात दुधाच्या उत्पादनांचा प्रमुख पुरवठार आहे आणि धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल देखील विकते. मदर डेअरी खाद्यतेल सामान्यत: किरकोळ विक्रेते बाटलीवर किंवा त्याच्या पॅकेटवर छापलेल्या एमआरपीपेक्षा कमी किमतीत विकतात.
सर्वसामान्य ग्राहकांना फायदा
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होईल. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे जुलै महिना सुरु होताच आणि मराठी कॅलेंडर प्रमाणे आषाढ महिना सुरु होताच, महाराष्ट्रातील सणासुदीला सुरुवात होते. या काळात तेलाचा खप वाढतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना नक्की होईल आहे.